Vidhan Parishad Election Updates : ठाकरेंचा खास माणूस राजकारणात: मिलींद नार्वेकर विजयी

Vidhan Parishad Election Live Updates : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान होत आहे.

Vidhasabha Result GIff

Vidhan Parishad Election Live Updates : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान पार पडले. त्यानंतर आता या निवडणुकीचे निकाल हाती आले असून, लोकसभेनंतर महायुतीने जोरदार कमबॅक केल्याचे पाहण्यास मिळत आहे. महायुतीने विधानपरिषदेसाठी मैदानात उतरवलेले सर्वच्या सर्व 9 उमेदवार विजयी झाले आहेत. त्यानंतर, ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकरही विजयी झाले आहेत. शेकापचे जयंत पाटील यांना केवळ 12 मते आहे. त्यामुळे नार्वेकारांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.

मैदानात कोण कोण?

भाजपचे उमेदवार : पंकजा मुंडे, परिणय फुके,  सदाभाऊ खोत, अमित गोरखे, योगेश टिळेकर

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) : शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकर

शिवसेना (शिंदे गट) : कृपाल तुमाने, भावना गवळी

शिवसेना (उबाठा) : मिलिंद नार्वेकर

शरद पवार गट पुरस्कृत उमेदवार : जयंत पाटील (शेकाप)

काँग्रेस : प्रज्ञा सातव

LIVE NEWS & UPDATES

  • 12 Jul 2024 07:18 PM (IST)

    तुमच्या विकेट पाडतच राहणार : एकनाथ शिंदे

    विधान परिषदेच्या पार पडलेल्या निवडणुकांमध्ये महायुतीचे सर्वच्या सर्व उमेदवार विजयी झाल्यानंतर महायुतीच्या नेत्यांचा विश्वास अधिक वाढला असून, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली असून, यात त्यांनी तुमच्या विकेट पडतच राहणार असा टोला विरोधी पक्षांना लगावला आहे.

  • 12 Jul 2024 07:15 PM (IST)

    महायुतीचे 9 उमेदवार विजयी; फडणवीसांचे एका ओळीचे ट्विट

    विधान परिषद निवडणुकीत महायुतीच्या सर्व नऊ उमेदवारांचा विजय झाला. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवघ्या एका ओळीचे ट्विट केले आहे. यात त्यांनी केवळ 9/9 आणि थंम दाखवले आहे.

  • 12 Jul 2024 07:12 PM (IST)

    MLC Election 2024 : महायुतीचे जोरदार कमबॅक; सर्वच्या सर्व उमेदवार विजयी

    विधानसभा निवडणुकीआधी विधानपरिषदेची अकरा जागांची निवडणूक महायुती आणि महाविकास आघाडीसाठी परीक्षा घेणारी ठरली. या निवडणुकीत लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा थोडासा का होईना वचपा महायुतीने काढल्याचे दिसत आहे. या निवडणुकीत महायुतीने एकूण 9 उमेदवारांना तिकीट दिले होते. या निवडणुकीत सर्व उमेदवार विजयी झाले आहेत.

     

    MLC Election 2024 : महायुतीचे जोरदार कमबॅक; सर्वच्या सर्व उमेदवार विजयी

  • 12 Jul 2024 07:07 PM (IST)

    माझ्या विजयाचा आनंद लोकांना झालाय

    भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी विजयानंतर प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, माझ्या विजयाचा आनंद लोकांना झालाय याचा फार आनंद आहे.  जिथे जास्त योगदान देऊ शकेन तिथं चांगलं काम करेल, असा शब्द देत लोकांच्या चेहऱ्यांकडून पाहून आनंद वाटत असल्याचेही पंकजा म्हणाल्या.

  • 12 Jul 2024 07:05 PM (IST)

    अजितदादांनी 5 मतांसाठी मानले आभार

    विधानपरिषद निवडणुकीत आमच्याकडे 42 मतं होती. आम्हाला 47 मतं मिळाली आहेत. आम्हाला अधिकची 5 मतं मिळाली. त्यांचे आभार मानतो, असं अजित पवार म्हणाले.

  • 12 Jul 2024 06:36 PM (IST)

    खोत पिछाडीवर तर, नार्वेकरांना एका मताची गरज

    सदाभाऊ खोत हे 14 मते घेऊन पिछाडीवर आहेत. ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकरही विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. त्यांना विजयासाठी केवळ एका मताची गरज आहे.

  • 12 Jul 2024 06:35 PM (IST)

    काँग्रेसच्या प्रज्ञा सातव विजयी

    काँग्रेसच्या उमेदवार प्रज्ञा सातव या 25 मतं मिळवत विजयी झाल्या आहेत.

  • 12 Jul 2024 06:34 PM (IST)

    शिवसेनेच्या भावना गवळी 24 मतं मिळवत विजयी

    एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या भावना गवळी 24 मतं मिळवत विजयी झाल्या आहेत. 

  • 12 Jul 2024 06:27 PM (IST)

    अजित दादांचे दोन्ही उमेदवार विजयी

    राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत, असा दावा सुनील तटकरे यांनी केला आहे. राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे हे निवडणूक लढवत होते. राजेश विटेकर यांना 23 मतं मिळाली आहेत.

  • 12 Jul 2024 06:24 PM (IST)

    भाजपने मारला विजयाचा चौकार

    विधान परिषदेच्या मतमोजणीत भाजपच्या चार उमेदवारांनी विजयाचा चौकार मारला असून, पंकजा मुंडे, परिणय फुके, अमित गोरखे, योगेश टिळेकरांनी बाजी मारली आहे. पंकजा मुंडे यांना 26, परिणय फुके यांना 26, योगेश टिळेकर यांना 26 मतं मिळाली आहेत.

  • 12 Jul 2024 06:20 PM (IST)

    भाजपचे योगेश टिळेकर यांचा 23 मतं मिळवून विजय

    भाजपचे योगेश टिळेकर पहिल्या फेरीममध्ये 23 मतं मिळवून विजयी झाले आहे. तर, परिणय फुके : 20, राजेश विटेकर : 21, अमित गोरखे : 22, शिवाजीराव गर्जे :20, पंकजा मुंडे :18, मिलिंद नार्वेकर :17, प्रज्ञा सातव :19, सदाभाऊ खोत : 10, कृपाल तुमाने : 16, भावना गवळी : 10, योगेश टिळेकर : 23, जयंत पाटील : 06

  • 12 Jul 2024 06:13 PM (IST)

    भाजपचे योगेश टिळेकर पहिल्या पंसतीच्या जवळ

    विधान परिषदेच्या मतमोजणीला सुरूवात झाली असून, पहिल्या पसंतीच्या विजयाजवळ योगेश टिळेकर पोहोचले असून, त्यांना 22 मते मिळाली आहेत. त्यांना आता केवळ एक मत हवे आहे.

  • 12 Jul 2024 06:10 PM (IST)

    शेकापच्या जयंत पाटील यांना 6 मतं

    शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटील यांना 6 मतं मिळाली आहेत. तर सदाभाऊ खोत यांना 9 मतं मिळाली आहेत. 

  • 12 Jul 2024 06:07 PM (IST)

    भाजपच्या पंकजा मुंडे यांना 10 मतं

    भाजपच्या पंकजा मुंडे यांना 10, कृपाल तुमाने 11 तर, योगेश टिळेकर यांना 13 मतं मिळाली आहेत.

  • 12 Jul 2024 06:06 PM (IST)

    ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकरांना 17 मतं

    ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकरांना 17 मतं मिळाली आहेत. तर काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांना 14 मतं मिळाली आहेत. राष्ट्रवादीच्या शिवाजीराव गर्जे यांना 12, कृपाल तुमाने यांना 12 मतं मिळाली आहेत.

  • 12 Jul 2024 06:00 PM (IST)

    मिलिंद नार्वेकर, प्रज्ञा सातव, योगेश टिळेकर यांची आघाडी

    विधानपरिषदेच्या मतमोजणीत मिलिंद नार्वेकर, प्रज्ञा सातव, योगेश टिळेकर यांनी आघाडी घेतल्याचे चित्र असून, मिलिंद नार्वेकर -८, कृपाल तुमाने - ३, जयंत पाटील - १, शिवाजीराव गर्जे - ८, प्रज्ञा सातव - १०, अमित गोरखे - ४, पंकजा मुंडे - १, राजेश विटेकर - ८, योगेश टिळेकर - ११

  • 12 Jul 2024 05:59 PM (IST)

    अमित गोरखेंना मिळालेल्या मतपत्रिकेवरून गोंधळ

    अमित गोरखेंना मिळालेल्या एका मतपत्रिकेवरून मतमोजणीवेळी गोंधळ, इंग्रजी आकड्यावरून गोंधळ

  • 12 Jul 2024 05:55 PM (IST)

    प्रज्ञा सातव , मिलिंद नार्वेकर यांना प्रत्येकी 7 मते

    विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली असून, मतमोजणीत कॉंग्रेसच्या उमेदवार प्रज्ञा सातव यांना 7 तर, ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांनाही 7 मते मिळाली आहेत. 

  • 12 Jul 2024 05:47 PM (IST)

    Vidhan Parishad Election Live Updates : पाहिलं मत भाजपच्या योगेश टिळेकरांना

    Vidhan Parishad Election Live Updates : पाहिलं मत भाजपच्या योगेश टिळेकरांना

  • 12 Jul 2024 05:45 PM (IST)

    Vidhan Parishad Election Live Updates : पसंतीक्रमानुसार मतमोजणीला सुरवात, 25 मतांचे 11 गठ्ठे तयार

    Vidhan Parishad Election Live Updates : विधानपरिषदेच्या मतमोजणीची सुरुवात झाली असून 25 मतांचे 11 गठ्ठे तयार करण्यात आले आहे. सध्या पसंतीक्रमानुसार मतमोजणी सुरू आहे.

  • 12 Jul 2024 05:40 PM (IST)

    Vidhan Parishad Election Live Updates : विधानपरिषद मतमोजणीसाठी 25-25 मतांचे गठ्ठे

    Vidhan Parishad Election Live Updates : विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली असून आता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मतमोजणीसाठी 25-25  मतांचे गठ्ठे केले आहेत. विजयासाठी 23 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे.

  • 12 Jul 2024 05:38 PM (IST)

    Vidhan Parishad Election Live Updates : विनायक राऊत, अनिल देसाई ठाकरे गटाचे निवडणूक प्रतिनिधी

    Vidhan Parishad Election Live Updates : विनायक राऊत, अनिल देसाई ठाकरे गटाचे निवडणूक प्रतिनिधी आहेत.

  • 12 Jul 2024 05:37 PM (IST)

    Vidhan Parishad Election Live Updates : उदय सामंत, बालाजी किणीकर शिवसेनाचे प्रतिनिधी

     Vidhan Parishad Election Live Updates :  विधान परिषदेच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून उदय सामंत, बालाजी किणीकर शिवसेनाचे प्रतिनिधी आहे.

  • 12 Jul 2024 05:30 PM (IST)

    Vidhan Parishad Election Live Updates : धनंजय मुंडे, अनिल पाटील अजित पवार गटाचे प्रतिनिधी

    Vidhan Parishad Election Live Updates : विधान परिषदेच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. अजित पवार गटाकडून धनंजय मुंडे आणि अनिल पाटील प्रतिनिधी आहेत.

  • 12 Jul 2024 05:26 PM (IST)

    Vidhan Parishad Election Live Updates : मोठी बातमी! विधान परिषदेच्या मतमोजणीला सुरुवात

    Vidhan Parishad Election Live Updates : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान पूर्ण झाले आहे. आता मतमोजणी सुरुवात झाली असून कोणत्या उमेदवाराचा पराभव होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

  • 12 Jul 2024 05:23 PM (IST)

    Vidhan Parishad Election Live Updates : मतमोजणी सुरू होण्यास विलंब; अधिकाऱ्यांना निवडणूक आयोगाच्या परवानगीची प्रतिक्षा

    Vidhan Parishad Election Live Updates : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान पूर्ण झाले आहे. 5 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार होती मात्र मतमोजणी परवानगी न आल्यानं मतमोजणी सुरु होण्यास विलंब होत आहे. मतमोजणीसाठी मतमोजणी अधिकारी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या परवानगीची प्रतिक्षा करत आहे.

  • 12 Jul 2024 04:12 PM (IST)

    Vidhan Parishad Election Live Updates : विधानपरिषदेसाठी मतदान पूर्ण, निकालाची प्रतीक्षा

    Vidhan Parishad Election Live Updates : आज विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी मतदान पूर्ण झाला आहे. सर्व 274 आमदारांच्या मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली असल्याने आता सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. या निवडणुकीत कोणाचा पत्ता कट होणार? याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

  • 12 Jul 2024 03:50 PM (IST)

    Vidhan Parishad Election Live Updates : भाजप व ठाकरे गट एकत्र येणार ?

    Vidhan Parishad Election Live Updates :

  • 12 Jul 2024 03:21 PM (IST)

    Vidhan Parishad Election Live Updates : कोणाचा होणार गेम?, निकालाकडे सर्वांच लक्ष

    Vidhan Parishad Election Live Updates : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या विधान परिषदेच्या 11 जागांसाठी जवळपास मतदान संपले असून आता या निवडणुकीत कोणत्या उमेदवाराचा पराभव होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

  • 12 Jul 2024 03:08 PM (IST)

    Vidhan Parishad Election Live Updates :  निवडणूक आयोग भाजपचा सालदार झाला : अंबादास दानवे 

    Vidhan Parishad Election Live Updates : आमदार गणपत गायकवाड आज निवडणूक आयोगाच्या परवानगीने मतदानाला विधान भवनात पोचले. केवळ आरोप असताना अनिल देशमुखांना यापूर्वी परवानगी नाकारण्यात आली होती.

    मग गायकवाड यांना पोलिस ठाण्यात गोळीबार करताना तर जगाने बघितले होते. आज निवडणूक आयोग भाजपचा सालदार झाल्याचे यातून दिसते. अशी टीका विधानपरिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली

follow us