MLC Election 2024 : महायुतीचे जोरदार कमबॅक; सर्वच्या सर्व उमेदवार विजयी

MLC Election 2024 : महायुतीचे जोरदार कमबॅक; सर्वच्या सर्व उमेदवार विजयी

MLC Election 2024 : विधानसभा निवडणुकीआधी विधानपरिषदेची अकरा जागांची निवडणूक (MLC Election 2024) महायुती आणि महाविकास आघाडीसाठी परीक्षा घेणारी ठरली. या निवडणुकीत लोकसभा निवडणुकीतील (Elections 2024) पराभवाचा थोडासा का होईना वचपा महायुतीने काढल्याचे (Mahayuti) दिसत आहे. या निवडणुकीत महायुतीने एकूण 9 उमेदवारांना तिकीट दिले होते. या निवडणुकीत सर्व उमेदवार विजयी झाले आहेत.

उमेदवारांना निवडून येण्यासाठी 23 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. मागील निवडणुकीचा अनुभव असल्याने काँग्रेस, ठाकरे गट सतर्क झाले होते. तर दुसरीकडे महायुतीनेही तगडे प्लॅनिंग केले होते. महाविकास आघाडीने एक जास्तीचा उमेदवार दिल्याने निवडणुकीत चुरस वाढली होती. या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी जास्तीच्या मतांची गरज राहणार होती. त्यामुळे क्रॉस व्होटिंग होण्याचीही भीती होती. यासाठी खबरदारी म्हणून भाजप, शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी अजित पवार आणि शिवसेना शिंदे गटाने आमदारांना पंचतारांकीत हॉटेलमध्ये ठेवले होते. मतदानाच्या दिवशी म्हणजे आज या आमदारांनी हॉटेलातून थेट सभागृह गाठले.

राजकीय वनवास संपला! अखेर पंकजा मुंडे बनल्या आमदार; विधानपरिषदेत मारली बाजी

मतदानानंतर निवडणूक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मतमोजणीला सुरुवात झाली. निकाल हाती आल्यानंतर महायुतीच्या नेत्यांचे चेहरे आनंदाने खुलले. क्रॉस व्होटिंगची जी भीती व्यक्त केली जात होती ती अनाठायी ठरल्याचे या निकालावरुन दिसत आहे. विधानपरिषदेतील या उमेदवारांसाठी आमदारांनीच मतदान केले होते. त्यामुळे त्या त्या पक्षाचे उमेदवार निवडून येण्याची खात्री होतीच. फक्त ऐनवेळी दगाफटका होऊ नये यासाठी भाजप, शिंदे गट, उद्धव ठाकरे गट आणि अजित पवार गटाने आपापल्या आमदारांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवले होते.

या निवडणुकीत भाजपने योगेश टिळेकर, पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, परिणय फुके आणि अमित गोरखे यांना उमेदवारी दिली होती. राष्ट्रवादी अजित पवार गटाने शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांना तर शिवसेना एकनाथ शिंदे गटाने माजी खासदार भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना तिकीट दिले होते. या सर्व उमेदवारांनी विजयाचा गुलाल उधळला आहे.

MLC Election 2024 : भाजपने विजयाचा गुलाल उधळला; योगेश टिळेकर विजयी

कुणाला किती मते मिळाली ?

भाजप 

योगेश टिळेकर – 26 मते

सदाभाऊ खोत – 26 मते

परिणय फुके – 26 मते

अमित गोरखे – 26 मते

पंकजा मुंडे – 26 मते

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार

शिवाजीराव गर्जे – 24 मते

राजेश विटेकर – 23 मते

शिवसेना एकनाथ शिंदे 

भावना गवळी – 24 मते

कृपाल तुमाने – 25 मते

follow us
  • fb
  • instagram
  • youtube