Ajit Pawar : बारामती विधानसभा मतदारसंघात (Baramati Assembly Constituency) यंदा दोन राष्ट्रवादी पक्ष आमनेसामने आहेत. राष्ट्रवादीकडून अजित पवार (Ajit Pawar) तर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून युगेंद्र पवार (Yugendra Pawar) निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दरम्यान, आजवर अजित पवार बारामतीमधून मोठ्या मताधिक्याने विजय झालेत. मात्र, यंदा पुतण्या युगेंद्रचे त्यांच्यासमोर मोठं आव्हान आहे. त्यामुळं यंदा बारामतीत कोण विजय होतयं, याविषयी सर्वांनाच उत्सुकता लागली. अशातच अजितदादांनी आपल्या लीडबद्दल दावा केला.
‘भाजपने काय करावं हा त्यांचा प्रश्न, मी मलिकांचा प्रचार करणारच’, अजिदादा स्पष्टचं बोलले
अजित पवारांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. यंदा बारामती विधानसभा मतदारसंघात किती लीड मिळणार याविषयी विचारलं असता ते म्हणाले की, सध्या मी प्रचारासाठी फिरतोय, बारामतीचा संपर्ण दौरा फिरून झाल्यावर लीड सांगेन… पण एवढं शंभर टक्के सांगतो की, चांगलं लीड असेल. मतदारांशी हितगुज करून रेकॉर्ड तोडेल की नाही ते सांगतो, असं अजितदादा म्हणाले.
Karad Assembly Constituency : अतुल भोसलेंसाठी खुद्द अमित शहा मैदानात; पृथ्वीराज चव्हाणांना धडकी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा बारामतीत होणार की नाही यावर अजित पवार म्हणाले, मला बारामतीत कोणाची सभा नको, त्यापेक्षा इतर भागांमध्ये त्यांचा सहभाग महत्वाचा आहे. इतर ठिकाणी वरिष्ठांच्या सभा होतीतल.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंचन घोटाळ्याची गोपनीय फाईल अजित पवारांना कशी दाखवली, असा सवाल विरोधक करत आहेत. यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार म्हणाले, सिंचन घोटाळा माहिती अधिकारात पाहिजे. ती माहिती तुम्हाला पाहायला मिळेल. एखाद्याने चुकीचं सागितलं तर तुम्ही दुरूस्त करून घ्यायला पाहिजे, असंही ते म्हणाले.
तुम्ही हे बंद करा – अजित पवार
सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर केलेल्या वक्तव्याविषयी विचारलं असता अजित पवार म्हणाले की, सदाभाऊ खोत यांनी यांनी केलेलं वक्तव्य निषेधार्ह आहे. मी त्यांचा तीव्र शब्दांत निषेध केलाय. खोत यांना देखील फोन करून सांगितलं की, तुमचं वक्तव्य आम्हाला अजिबात आवडलेलं नाही. तुम्ही हे बंद करा, वैयक्तिक पातळीवर बोलणं चुकीच आहे. महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृत राजकारणाचं उदाहरण घालून दिलंय. आरोप-प्रत्यारोप मांडण्याची एक पद्धत असते, असं अजितदादा म्हणाले आहेत.