Rahul Gandhi : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) येत्या 4 ऑक्टोबरला कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. राहुल गांधी यांचा महिनाभरातील हा दुसरा महाराष्ट्र दौरा आहे. येत्या काही दिवसांत राज्यात विधानसभा निवडणुका (Vidhansabha Election) होणार आहेत. त्याचे रणशिंग ते कोल्हापूरमधून फुकणार असल्याची चर्चा सुरू झाली.
उद्धव ठाकरेंनी एकदा आपला चेहरा आरशात बघून घ्यावा; अमित शाहांवरील टीकेला फडणवीसांचे चोख प्रत्त्युतर
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या यशामुळे राहुल गांधी यांचे महाराष्ट्रातील दौरे वाढवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. जम्मू-काश्मीर आणि हरियाणापाठोपाठ आता महाराष्ट्रातही आरक्षण आणि संविधानाच्या मुद्द्यावर राहुल गांधी आक्रमकपणे प्रचार करतील असं बोलल्या जातं. दरम्यान, 4 आणि 5 ऑक्टोबर रोजी त्यांचा दोन दिवसांचा दौरा असेल. या दौऱ्यात ते कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करणार असल्याचे आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी सांगितले.
शरद पवार हे मिनी औरंगजेब, त्यांनीच…; गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल
कसबा बावडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण राहुल गांधी यांच्या हस्ते होणार असून कोल्हापुरात होणाऱ्या संविधान सन्मान परिषदेला ते उपस्थित राहणार आहे, अशी माहिती सतेज पाटील यांनी दिली.
कसा आहे दौरा?
राहुल गांधी 4 ऑक्टोबर 6 वाजता बावडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण करतील. 5 ऑक्टोबर रोजी सायंकाळी कसबा बावड पॅव्हेलियन मैदानावर 2001 चे कलाकार नाट्य सादरीकरण करणार आहेत. यामध्ये 1000 कलाकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत दिसणार आहेत. या माध्यमातून महाराजांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे सतेज पाटील यांनी सांगितले.
5 ऑक्टोबरला सकाळी राहुल गांधी राजर्षी शाहूंच्या समाधी स्थळाला भेट देणार आहेत. यानंतर ते कोल्हापुरात आयोजित संविधान सन्मान संमेलनाला उपस्थित राहणार आहेत. या संमेलनात 1 हजाराहून अधिक निमंत्रित सहभागी होणार आहेत. त्यात सर्व धर्माचे लोक तसेच विविध स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश असेल. यावेळी राहुल गांधी सर्वांशी चर्चा करणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं.
काँग्रेस ऑलरेडी हाउसफुल
दरम्यान, राज्यातील बडे नेते कोल्हापुरात असल्याने काँग्रेसमध्ये इनकमिंग होणार का,? या पत्रकारांच्या प्रश्नावर सतेज पाटील यांनी काँग्रेस ऑलरेडी हाउसफुल आहे, मात्र, येणाऱ्यांचे स्वागतच असेल, असा सूचक संदेश सतेज पाटील यांनी दिला.
दरम्यान, येत्या काही दिवसांत राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राहुल गांधींचा हा दौरा काँग्रेसला ऊर्जा देणार ठरणार आहे.