Vidhansabha Election : अवघ्या काही महिन्यांवर महाराष्ट्र विधानसभा निवडणुका (Vidhansabha Election) आल्या आहेत. तत्पूर्वी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात या निवडणुकीत थेट लढत होणार आहे. दरम्यान, कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? याबाबत एक ओपिनियन पोल समोर आला. यात महायुतीला सर्वाधिक जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला.
CBI ची मोठी कारवाई, दिल्ली प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्याच्या घरातून 2.3 कोटी रुपयांची रोकड जप्त
टाईम्स नाऊ आणि मॅट्रिझनं एक सर्व्हे केला आहे. या सर्व्हेनुसार विधानसभा निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे. मात्र गेल्या निवडणुकीच्या तुलनेत त्यांच्या जागा कमी होण्याची शक्यता आहे. भाजपला 83 ते 93 जागा मिळू शकतात. सर्व्हेनुसार, महायुतीला 137 ते 152 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला 129 ते 144 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला. राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी 145 आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात निकराची लढत पाहायला मिळू शकते.
बारामतीकर हुशार, योग्य निर्णय घेणार, गब्बरच्या पत्रावर सुनील तटकरेंची प्रतिक्रिया
महायुतीत भाजपला सर्वाधिक जागा
भाजपला 26.2 टक्के मतांसह 83 ते 93 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर शिंदेसेनेला 16.4 टक्के मतांसह 42 ते 52 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला. सर्व्हेनुसार अजित पवार गटाला केवळ 2.8 मते मिळतील आणि त्यांचे केवळ 7 ते 12 उमेदवार निवडून येतील. त्यामुळे अजित पवार यांची ताकद कमी होताना दिसत आहे.
मविआत कॉंग्रेस ठरणार मोठा पक्ष…
दुसरीकडे महाविकास आघाडीत कॉंग्रेस लोकसभेप्रमाणे सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. काँग्रेसला 16.2 टक्के मतांसह 56 ते 68 जागा, ठाकरेसेनेला 14.2 टक्के मतांसह 26 ते 31 जागा आणि शरद पवार गटाला 13.7 टक्के मतांसह 35 ते 45 जागा मिळण्याची शक्यता आहे. मविआला 129 ते 144 जागा मिळण्याची शक्यता आहे.