CBI ची मोठी कारवाई, दिल्ली प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्याच्या घरातून 2.3 कोटी रुपयांची रोकड जप्त

  • Written By: Published:
CBI ची मोठी कारवाई, दिल्ली प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्याच्या घरातून 2.3 कोटी रुपयांची रोकड जप्त

Delhi Pollution Board : सीबीआयने (CBI) मोठी कारवाई करत दिल्ली प्रदूषण नियंत्रण समिती (DPCC) वरिष्ठ पर्यावरण अभियंता मोहम्मद आरिफ (Mohammad Arif) यांच्या निवासस्थानावर छापा टाकून तब्बल 2.39 कोटी रुपयांची रोखड जप्त केली आहे.

माहितीनुसार, सीबीआयने आरिफ आणि मध्यस्थांचा मुलगा किशले शरण सिंग (Kishlay Sharan Singh) यांना 91,500 रुपयांची लाच घेताना अटक केली आहे. या प्रकरणात सीबीआयने आरिफसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यात मध्यस्थ त्याचा मुलगा, एका खाजगी कंपनीचा मालक आणि इतर अज्ञात व्यक्तींचा समावेश असल्याची माहिती सीबीआयने दिली आहे.

खाजगी कंपन्यांसाठी डीपीसीसी मंजुरीचे नूतनीकरण करण्याच्या बदल्यात आरिफ लाच घेत होता असा आरोप करण्यात आला आहे. मध्यस्थाने या लाचांची सोय केली, कंपन्यांकडून पैसे गोळा केले आणि ते नियमितपणे आरिफपर्यंत पोहोचवले.

सीबीआयला माहिती मिळाल्यानंतर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून आरिफ आणि मध्यस्थांच्या मुलाला लाच घेताना रंगेहात पकडले. अटकेनंतर आरिफच्या घराची आणि कार्यालयाची झडती घेण्यात आली, ज्यात रोख रक्कम आणि मालमत्तेची कागदपत्रे सापडली. सीबीआयकडून कथित भ्रष्टाचाराची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

या प्रकरणात नाव असलेल्या लोकांचा समावेश  

मोहम्मद आरिफ – वरिष्ठ पर्यावरण अभियंता, डीपीसीसी

भागवत शरण सिंह – मध्यस्थ

किशले शरण सिंग – मध्यस्थ मुलगा

राज कुमार चुघ – प्रोप्रायटर, मेसर्स राम इलेक्ट्रोप्लेटर्स

गोपाल नाथ कपुरिया – मेसर्स एमव्हीएम, नरेला इंडस्ट्रियल

एरिया इतर अनोळखी सार्वजनिक सेवक आणि खाजगी व्यक्ती

बारामतीकर हुशार, योग्य निर्णय घेणार, गब्बरच्या पत्रावर सुनील तटकरेंची प्रतिक्रिया

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या