रवींद्र चव्हाणांसोबतच्या संबंधामुळे मला टार्गेट केलं जातंय – विजय केनवडेकर

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे निकटवर्तीय असलेले विजय केनवडेकरआणि कुटुंबातील सदस्यांची पत्रकार परिषद

sindhudurg politics

rane family and bjp

Vijay Kenavdekar Reaction : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी स्टिंग ऑपरेशन करत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे निकटवर्तीय असलेले विजय केनवडेकर यांच्या घरातून 20 लाख रुपयांची रोकड जप्त केली होती. त्यावरून राजकारण चांगलाच तापलं असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. या प्रकरणात राणे बंधूच आता समोरासमोर उभे ठाकले आहेत. अशातच आता केनवडेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांचं म्हणणं मांडलंय. हा सगळं प्रकार म्हणजे महाराष्ट्रातील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न आहे. काल जो प्रकार घडला तो पूर्णपणे चुकीचा आहे. माझं संपूर्ण घर हे संघाचं आहे. नारायण राणे (Narayan Rane) यांच्या प्रचाराला मी सर्वात पुढे होतो. हा जो प्रकार घडलाय त्याबद्दल देखील त्यांनी स्पष्टीकरण दिलंय.

जेव्हा आमदार निलेश राणे (Nilesh Rane) हे आमच्या घरी आले, तेव्हा त्यांनी बेल वाजवून विचारलं की विजय केनवडेकर (Vijay Kenvadekar) आहेत का? आणि थेट माझ्या घरात घुसले. निलेश राणे यांचं देखील काम मी केलंय. मला त्यांनी कॉल केला असता तर मी स्वतः त्यांना माझ्या घराची झडती घेऊ दिली असती. हे राजकारण 3 तारखेला संपेल, मात्र अशा घटना घडत असतील तर कोण या राजकारणात काम करेल? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

राज्यात पुन्हा राजकीय भूकंप? रवींद्र चव्हाण म्हणाले, 2 तारखेपर्यंत युती टिकवायची अन्…

माझ्या घरात सापडलेले पैसे हे माझ्या व्यवसायातले आहेत. आमचे अनेक व्यवसाय आहेत. माझा kk बिल्डर्स नावाने कंस्ट्रक्शनचा व्यवसाय असून माझी पत्नी वेदिका या मला व्यवसायात पार्टनर आहेत. या घटनेनंतर माझे संपूर्ण कुटुंब दहशतीखाली आहे. केवळ रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्याशी माझे संबंध आहेत म्हणून मला टार्गेट केलं जातंय. तसेच माझ्यावर जे आरोप होत आहेत त्यात काहीही तथ्य नसून दत्ता सामंत आणि वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी सांगावं की मी कोणाला पैसे दिलेत. त्यांनी ही गोष्ट सिद्ध केली तर राजकारण सोडून देईल. माझ्या घरात सापडलेले पैसे हे माझ्या नातेवाईकांनी आणि मित्रपरिवाराने दिले आहेत. या सगळ्या प्रकरणात आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मला धीर दिला.

माझा निलेश राणे किंवा नारायण राणे यांच्यावर राग नाहीये. मात्र निलेश राणे जे काही वागले ते चुकीचं वागले. माझ्या वडिलांच्या आतापर्यंतच्या तपश्चर्येवर त्यांनी घाला घातलाय. मी काही उमेदवार नाहीये. 20 लाख रुपये जप्त केल्याचं पत्र मला निवडणूक आयोगानं दिलंय. त्या पैशांचे डिटेल्स मागितल्यावर मी ते त्यांना देईल. तसेच काही लोकं निलेश राणे यांचे कान फुकट असल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी केलाय. तसेच मी देखील भाजपचा कार्यकर्ता आहे. घाबरणार नाही आणि जोमाने काम करेल. आतापर्यंत अशी अनेक प्रलोभन आली, मात्र भाजप सोडणार नाही. असं देखील यावेळी ते म्हणाले.

Exit mobile version