Vijay Shivatare : शिवसेनेचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivatare) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यातील वाद सुर्वश्रृत आहे. अजित पवार महायुतीत (Mahayuti) आले तरी त्यांच्यातील संघर्ष कमी होतांना दिसत नाही. काहीच दिवसांपूर्वी त्यांनी विधानसभेच्या बाबतीत निर्णय झाल्याशिवाय, लोकसभेसाठी (Lok Sabha Elections) काम करणार नाही, असा इशारा दिला होता. तर आता पुन्हा एकदा शिवतारेंनी दोन्ही पवाारांना आव्हान दिलं. त्यांनी बारामली लोकसभा लढण्याचे संकेत दिले.
Ayushmann Khurrana: मेनस्ट्रीमचा पहिला पुरस्कार जिंकल्यावर अभिनेत्याची प्रतिक्रिया; म्हणाला…
बारामती लोकसभा मतदारसंघात पवार विरुद्ध पवार अशी लढत होण्याची चिन्हे आहेत. महायुतीकडून सुनेत्रा पवार आणि महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. हाच धागा पकडून शिवतारेंनी आज कार्यक्रमात बोलत असताना पवारांवर तोफ डागली. ते म्हणाले की, सासवडच्या पालखीतळावर अजित पवारांनी केलेला अपमान हा केवळ विजय शिवतारेंचाच नाही, तर पुरंदरच्या तमाम स्वाभिमानी जनतेचा आहे. अजित पवार त्या अपमानासाठी इथं या येऊन या जनतेची माफी मागणार का, असा सवालही शिवतारे यांनी केला.
Oscars 2024: कला- दिग्दर्शक नितीन देसाईंना ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात श्रद्धांजली, पाहा व्हिडिओ…
पुढं बोलतांना ते म्हणाले की, बारामती लोकसभा मतदारसंघ हा कुणाचा सातबारा नाही. आपण पवार कुटुंबियांनाच का मतदान करावं? बारामती लोकसभा मतदारसंघात पवारांच्या विरोधात 5 लाख 80 हजार मतदार आहेत. त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीत आरपारची लढाई करणार, आता बदला घ्यायची वेळ आली, त्यासाठी तुमच्या सर्वांची साथ हवी… आता गुलामगिरी करणार नाही, असं म्हणत शिवतारे यांनी लोकसभा लढण्याचे संकेत दिले.
दरम्यान, येणाऱ्या निवडणुकीत आरपारची लढाई करणार असं सूचक विधान शिवतारेंनी केलं. त्यामुळं त्यामुळं आगामी लोकसभेत दोन पवार विरुध्द आणि विजय शिवतारे अशी लढाई होणार का, हेच पाहणं महत्वाचं आहे.
अजित पवार-विजय शिवतारे कट्टर विरोधक
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विजय शिवतारे यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले विजय शिवतारे यांनी 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी अजित पवार यांनी थेट आव्हान देत शिवतारेंचा यांचा पराभव केला होता. त्यामुळे आता शिवतारे लोकसभा निवडणुकीत याचा बदला घेणार असल्याचं दिसतं.