Download App

जनतेने नतद्रष्ट सरकारच्या छातीतली हवा काढली; वडेट्टीवारांचा राज्यासह केंद्र सरकारवर घणाघात

महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद झाली. त्यामध्ये विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यसरकारसह केंद्रावर टीका केली.

  • Written By: Last Updated:
Image Credit: Letsupp

Mahavikas Aghadi Press Conference : देशात जे सरकार आहे ते विश्वासघातकी सरकार आहे. कारण सरकारने कुठल्याही शेतीमालाला दीडपट भाव दिलेला नाही. तसंच, 2013 ला जे मालाला भाव मिळत होते. (Mahavikas Aghadi ) तेच जर आज मिळत असतील तर या सरकारला महापापी सरकार म्हटलं पाहिजे अशा शब्दांत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारवर घणाघात केला. (Vijay Vadettiwar) तसंच, राज्यातील अभद्र युती ज्याला आपण अनैतिक संगत म्हणतो ते आपल्या राज्यात झालं आहे असंही वडेट्टीवार यावेळी म्हणाले. ते महाविका आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलत होते.

हुकुमशाही पद्धतीने राज्य चालू शकत नाही 

यावेळी वडेट्टीवार यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही जोरदार टीका केली. परंतु, फुगलेल्या छातीतील हवा जनतेने काढली आहे असा टोलाही वडेट्टीवार यांनी यावेली लगावला आहे. आज राजश्री शाहु महाराजांची जयंती आहे. ते लोकशाहीवादी होते. मात्र, दोन वर्षापूर्वी लोकशाहीचा गळा घोटून राज्यात सरकार स्थापन करण्यात आलं असंही वडेट्टीवार यावेळी म्हणाले. परंतु, अहंकाही आणि हुकुमशाही पद्धतीने कुणाचंच राज्य चालू शकत नाही हे लोकांनी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत दाखवून दिलं आहे असंही यावेळी वडेट्टीवार म्हणाले आहेत.

नतद्रष्ठ सरकार Video : राहुल अन् अखिलेशचे;वार वर वार तेव्हा सभागृहात उभा ठाकला मोदींचा;हनुमान

महाराष्ट्रात मोठी हार झाल्यानंतर आम्हाला वाटल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटतील आणि हमी भावाबद्दल बोलतील असं आम्हाला वाटत होतं. परंतु, त्यांनी अशी काही भेट घेतली नाही आणि तशी मागणीही केली नाही. त्यामुळे या तिघांनीही शेतकऱ्यांची मोठी फसवणूक केली आहे असा थेट आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे. तसंच, बी-बियानांवर खतांवर जीएसटी लावणार हे नतद्रष्ठ सरकार हेलिकॉप्टर, सोनं इतर महागड्या गोष्टींवर कमी जीएसटी लावत आहे. त्यामुळे हे कमीशन सरकार शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसणारं सरकार आहे असंही वडेट्टीवार यावेळी म्हणाले. जनाधार गमावलेलं हे सरकार या सरकारचं हे शेवटचं अधिवेशन आहे असंही ते म्हणाले.

सरकारने दिवसा लूट सुरू केली

गेल्या दहा वर्षातील हिशोब काढून बघा यांनी बी- बियानांचे दर दुप्पट केले आहेत. आणि ज्यांची किंमत कमी केली त्यातील कॉनटीटी कमी केली असंही ते म्हणाले आहेत. तसंच, मृत्यूनंतर जे अंत्यसंस्कारासाठी सामान लागते तेसुद्धा महाग केलं आहे. म्हणजे या सराकने मरणही स्वस्त ठेवलं नाही असा टोलाही वडेट्टीवार यांनी लगावला. तसंच, केंद्र सरकारच्या तालावर राज्य सरकार चालत असून हे सरकार शेतकऱ्यांच मारेकरी आहे असा थेट आरोप त्यांनी यावेळी केला आहे. या सरकारने दिवसा लूट सुरू केली आहे. या शेतकरी विरोधी सरकारचा चेहरा आम्ही विधानसभेत उघडा पाडू असंही यावेळी वडेट्टीवार म्हणाले आहेत.

 शेतकऱ्यांना काहीच मिळालं नाही निलेश लंके खासदार आता पारनेरचा आमदार कोण?; मविआ अन् महायुतीचं गणित काय..

हे सरकार आता ट्रीपल इंजिनच आहे. दोन इंजिनच सराकर आता ट्रिपल होऊन चौथ्याला कॅरीजला धरायला लावलं आहे अशी खरमरीत टीका वडेट्टीवार यांनी केली आहे. असं असतानाही हे सरकार केंद्र सराकचं अभिनंदन करत आहे. काहीच काम सराकरने केलं नसलं तरी अभिनंदन माननं सुरू आहे. गेल्यावर्षी अहवाल पाठवण्यास उशिर झाल्याने शेतकऱ्यांना काहीच मिळालं नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना उध्वस्त करणार सरकार आहे असंही वडेट्टीवार यावेळी म्हणाले आहेत.

सीएएला विरोध राहणार 

कमिशन मिळत नाही म्हणून सीएमओ ऑफिस सही करत नाही असा थेट आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे.
चंदा लो धंदा दो असं धोरण या सरकारचं आहे. घोषना देतात ना खाऊंगा ना खाणे दुंगा और जो खाता हे उनको साथ मै लुंगा हा नवीन नारा आहे असा टोलाही वडेट्टीवार यांनी लगावला आहे. हे सगळे मुद्दे आम्ही विधान सभेत मांडू असं म्हणत या सरकारने ४०%. कमिशन सरकार असून सरकारमधील मंत्री गुंडांना पोसत आहेत असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. त्यासोबतच जर महाराष्ट्रात CAA आणि NRC लागू करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याला विरोध करू असही वडेट्टीवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

अंबादास दानवे काय म्हणाले?

राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किती चुकिच्या, बेजबाबदार पद्धतीने वागत आहेत हे दिसून आलं आहे. परंतु, सर्व बॅंका सिव्हीलचा नियम लावत आहेत. परंतु, कोणत्याचं बँकेवर कारवाई नाही अशी खंत उपस्थित करत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. तसंच, सरकार प्रचंड बेजबाबदार आहे असंही ते यावेळी म्हणाले आहेत.

बाय बाय सरकार

राज्यात विज विभाग, पोलीस विभाग यातील पदं भरलेली नाहीत. राज्य सरकार याकडे पाहात नाही डोळे बंद करून हे सरकार पाहत आहे. त्यामुळे या सराकच्या चहापानाला आम्ही जाणार नाही. यावेळी हाय हाय सरकार नाही तर या अधिवेशनात आम्ही या सरकारला बाय बाय सरकार करणार आहेत असा टोलाही दानवे यांनी यावेळी लगावला आहे.

follow us

वेब स्टोरीज