Vijay Wadettiwar : गुरुवारी सकाळपासून राज्यातील अनेक शहरांमध्ये पावसाचा जोर (Heavy Rain) वाढला आहे. कामावर जाणाऱ्या लोकांना या पावसाचा मोठा फटका बसला. पावसामुळे सर्वसामान्यांचे हाल होणं काही नवीन नाही. मात्र,आता खुद्द राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनाही या पावसाचा फटका बसल्याचं समोर आलं. वडेट्टीवार यांच्या शासकीय निवासस्थानाला गळती लागल्याचा प्रकार समोर आला.
वडेट्टीवारांच्या सी ६ प्रचीतगड निवासस्थानच्या छपराला गळती#VijayWadettiwar #Prachitgad6 #Congress pic.twitter.com/GiUn4eYrfd
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) July 18, 2024
बैठकीला दांडी! नितीन देशमुखांनी तहसीलदार अन् कृषी अधिकाऱ्यांना कोंडूनच घेतलं
वडेट्टीवार यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या सी ६ प्रचीतगड बंगल्याच्या छताला गळती लागली आहे. या गळतीचा व्हिडिओ वडेट्टीवार यांनी शेअर केला आहे. या व्हिडिओत दिसतं की, प्रचीतगड बंगल्याच्या छतामधून पाणी गळत आहे. हे पावसाचे पाणी बंगल्यात पसरू नये म्हणून खाली बादल्या ठेवण्याची वेळ आली आहे. दरम्यान, काहीच दिवसांपूर्वी लाखो रुपये खर्च करून या बंगल्याची दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर काहीच दिवसात पुन्हा बंगल्याला गळती लागल्याचा प्रकार घडल्याने वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त केला. या गळतीप्रमाणे सरकारलाही गळती लागली आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
Gharat Ganapati : ‘घरत गणपती’ साठी डॉ. शरद भुताडिया आणि सुषमा देशपांडे एकत्र
सरकारचं लक्ष कमिशन खाण्याकडे
दरम्यान, सरकारी निवासस्थानाला गळती कशी लागली आणि आपण काही दुरुस्तीसाठी पाठपुरावा केला आहे का? असा सवाल केला असता वडेट्टीवार म्हणाले की, आम्ही याबाबत सरकारला कळवलं आहे. मात्र, याकडे कोणाचेही लक्ष नाही. याचं लक्ष फक्त टेंडर काढणं आणि कमिशन खाण्याकडे आहे. या गळतीप्रमाणे सरकारलाही गळती लागली आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
ते म्हणाले, आठ दिवसांपासून टेलिफोन बंद आहे. अनेक तक्रारी देखील आम्ही केल्या आहेत. मात्र, काही झालं नाही, असं वडेट्टीवार म्हणाले.