बैठकीला दांडी! नितीन देशमुखांनी तहसीलदार अन् कृषी अधिकाऱ्यांना कोंडूनच घेतलं

बैठकीला दांडी! नितीन देशमुखांनी तहसीलदार अन् कृषी अधिकाऱ्यांना कोंडूनच घेतलं

Nitin Deshmukh News : अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांनी विमा कंपन्यांच्या तक्रारीविरोधात नगरपालिकेत सर्व अधिकाऱ्यांसह विमा कंपन्यांची बैठक बोलावली. या बैठकीला तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांनी दांडी मारल्याने संतप्त देशमुखांनी तहसीलदारांसह कृषी अधिकाऱ्यांना कोंडूनच घेतलं. जोवर शेतकऱ्यांचा विमा प्रश्न सुटत नाही तोवर कोणालाही आतून सोडणार नसल्याची भूमिका देशमुख यांनी घेतलीयं.

Sonam Kapoor: फॅशनची आवड पूर्ण करण्यासाठी उधार घेऊन कपडे घालते, अभिनेत्रीने केला खुलासा

नेमकं काय घडलं?
मागील अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळत नसल्याचे प्रकार समोर आले आहेत. तर अनेक शेतकऱ्यांना काही तांत्रिक अडचणी येत आहेत. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आमदार नितीन देशमुखांनी बैठकीचं आयोजन केलं होतं. ही बैठक नगरपालिकेत होती. या

या बैठकीसाठी नगरपालिकेत सर्व अधिकारी आणि विमा कंपन्यांच्या पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आलं होतं. मात्र विमा कंपन्यांचे आणि कृषी विभागाचे अधिकारी या बैठकीसाठी आलेच नाहीत. त्यामुळे नितीन देशमुख प्रचंड संतापले. त्यांनी थेट तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांना कोंडून ठेवलं.

ऐन निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना कोरोना; पोस्ट करत म्हणाले मी पुन्हा येईन…

जोपर्यंत विमा कंपनीचे पदाधिकारी याठिकाणी येत नाहीत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढच नाहीत तोवर तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांना आम्ही सोडणार नाही,सर्व दरवाजे लावून घ्या असंही आमदार नितीन देशमुख यांनी यावेळी बोलताना म्हटलं आहे. शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आणि तक्रारी आहेत.

नेक शेतकऱ्यांना विम्याचे पैसै मिळात नाहीत. तर अनेकांना पीक विमा भरताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर नितीन देशमुखांनी बैठक आयोजित केली होती. या बैठकीला नगरपालिकेत सर्व अधिकारी आणि विमा कंपन्यांच्या पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याबाबत सांगण्यात आलेलं होतं.

दरम्यान, आमदार नितीन देशमुख यांनी बैठकीला उपस्थित न राहिल्याने देशमुखांनी संताप व्यक्त केलायं. त्यानंतर त्यांनी थेट तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांना कोंडून ठेवल्याचं समोर आलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube