“मविआ म्हणजे भ्रष्टाचार, वसुली अन् टोकन मनी..” PM मोदींनी व्याख्याच सांगितली

“मविआ म्हणजे भ्रष्टाचार, वसुली अन् टोकन मनी..” PM मोदींनी व्याख्याच सांगितली

PM Narendra Modi Speech in Akola : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महायुतीच्या (PM Narendra Modi) उमेदवारांच्या प्रचारासाठी अकोल्यात जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी आपल्या आक्रमक शैलीत महाविकास आघाडी आणि काँग्रेसवर जोरदार (Congress Party) प्रहार केले. मोदींनी नेहमीप्रमाणे मराठीतून भाषणाला सुरुवात केली. नंतर त्यांनी आपल्या भाषणात राज्यातील महायुती सरकार आणि केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयांचा आणि योजनांचा उल्लेख केला. काँग्रेसवर आणि महाविकास आघाडीवर घणाघाती टीका करताना त्यांनी शरद पवार यांच्यावर मात्र टीका करण्याचे टाळले.

मोदी म्हणाले, काँग्रेस आणि आघाडीवाल्यांनी राज्यातील लोकांची मागणी दशकांपर्यंत पूर्ण केली नाही. ती मोदीने तत्काळ पूर्ण केली. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचं सौभाग्य आम्हाला मिळालं. केंद्रात एनडीए सरकार आता वेगात चाललंय. आता त्याच गतीचं महायुतीचं सरकार मला महाराष्ट्रात पाहिजे. यासाठी मी तुमच्याकडे आशीर्वाद मागण्यासाठी आलोय. महायुतीची पुढील पाच वर्षे कशी असतील याची एक झलक वचननाम्यातून दिसत आहे. आता मविआचं घोटाळापत्रही आलंय. मविआ म्हणजे भ्रष्टाचार. मविआ म्हणजे वसूली, मविआ म्हणजे टोकन मनी, मविआ म्हणजे ट्रान्सफर पोस्टिंगचा धंदा.. हे लक्षात ठेवा असे मोदी म्हणाले.

मविआच्या गाडीला ना चाक ना ब्रेक.. ड्रायव्हर सीटसाठीही वाद; पहिल्या प्रचारसभेत मोदींचा ‘प्रहार’

तीन राज्ये काँग्रेसच्या शाही परिवाराचे एटीएम

जिथे काँगेस सराकार येते ते राज्य काँग्रेसच्या शाही परिवाराचे एटीएम बनते. सध्या कर्नाटक, तेलंगाणा आणि हिमाचल प्रदेश ही तीन राज्ये एटीएम बनले आहेत. लोक सांगत आहेत की महाराष्ट्रात निवडणुकीच्या नावावर कर्नाटकात वसूली डबल होतेय. कर्नाटतकात या लोकांनी दारू विक्रेत्यांकडून सातशे कोटींची वसूली केल्याचा आरोप आता होतोय. काँग्रेस घोटाळे करून निवडणूक लढत आहे विचार करा जर काँग्रेस निवडून आली तर किती घोटाळे करील. त्यामुळे काँग्रेसपासून सावध राहा. घोटाळेबाजांचे एटीएम महाराष्ट्राला बनू देणार नाही इतके मी नक्कीच सांगतो.

महाराष्ट्र आणि विदर्भात पाण्याचं संकट वाढलं होतं. पण काँग्रेसचं सरकार इथे असताना त्यांनी फक्त आपले खिसे भरण्याचे काम केलं. नंतर देवेंद्र फडणवीस सरकारच्या सिंचन योजनांना मविआने ब्रेक लावला होता. सरकार पुन्हा आल्यानंतर सिंचनाच्या योजना पुन्हा सुरू केल्या. सरकार आता शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवत आहेत. त्यांचे उत्पन्न वाढवत आहोत आणि खर्च कमी करत आहे.

Modi 3.0 : PM मोदींचे मंत्रिमंडळ किती शिकलेले? जाणून घ्या, प्रत्येक मंत्र्याची शैक्षणिक पार्श्वभूमी

जातीजातीत वाद हाच काँग्रेसचा इतिहास

काँग्रेसला माहिती आहे देश जितका कमजोर होईल तितकी काँग्रेस मजबूत होईल आणि काँग्रेस जितकी मजबूत देश तितका मजबूर होईल. काँग्रेसचा इतिहास पाहा. जातीजातीत वाद हीच काँग्रेसची प्रवृत्ती आहे. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने कधीच दलित, आदिवासींना एकत्र येऊ दिलं नाही. त्यांना जातापातीत विभागून टाकलं. ओबीसी नाव ऐकलं की काँग्रेस चिडते. ओबीसींची ओळख होऊ नये यासाठी विविध खेळ काँग्रेसने आतापर्यंत खेळले आहेत. काँग्रेस याचा फायदा घेईल. तुमचे अधिकार हिरावून घेईल. म्हणून काँग्रेसच्या या षडयंत्रापासून सावध राहा. एक है तो सेफ है इतकंच लक्षात ठेवा, असेही मोदींनी यावेळी स्पष्ट केले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube