धक्कादायक! विटांचा ट्रक दुचाकीवर कोसळला; ढिगाऱ्याखाली दबून 5 जणांचा मृत्यू..

Akola News : विदर्भातील अकोला जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. विटांचा ट्रक दुचाकीवर कोसळून झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. विटांच्या ढिगाखाली दबून या लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अकोला-मंगरुळपीर रस्त्यावरील दगडपारवा गावाजवळ ही दुर्घटना घडली. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रस्त्यांवर वाहनांचा वेग भरधाव (Road Safty) असतो. त्यामुळे वाहन नियंत्रित करणे सहजासहजी शक्य होत नाही. रस्त्यावर अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी सातत्याने केली जात आहे. अपघातांची संख्या कमी करण्यासाठी या उपाययोजनांची गरज आहे. उपाययोजना प्रत्यक्षात अंमलात आणण्याचीही गरज आहे. अपघात रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्या तरी या महामार्गावर अपघात सातत्याने होत आहेत. उपाययोजना प्रत्यक्षात अंमलात आणण्याचीही गरज आहे. परंतु त्यानुसार कार्यवाही होताना दिसत नाही. त्यामुळे रस्ते अपघातांच्या संख्येत सातत्याने वाढ होत चालली आहे.
वाढदिवसाची पार्टी ठरली अखेरची, पुण्यात भीषण अपघातात दोघांचा मृत्यू; 4 जण जखमी
विटांचा ट्रक कोसळल्याने पाच जणांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे यात ट्रकमधील चार जणांचा समावेश आहे. या अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांना अकोला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी येथे धाव घेतली. त्यानंतर लोकांना ट्रक सरळ करण्याचा प्रयत्न केला. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्यात आले. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.