APMC Election : अकोला बाजार समितीवर सर्वपक्षीय सहकार आघाडीची सत्ता पण सभापती राष्ट्रवादीचा

  • Written By: Published:
APMC Election : अकोला बाजार समितीवर सर्वपक्षीय सहकार आघाडीची सत्ता पण सभापती राष्ट्रवादीचा

Akola APMC Election : सध्या राज्यभरात बाजार समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. आज राज्यातील ग्रामीण राजकारणाचे केंद्र समजल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान पार पडलं. या निवडणुकांमध्ये अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. तर आज यापैकी अनेक बाजार समित्यांची मतमोजणी होत आहे.

या दरम्यान अकोला बाजार समितीचा निकाल हाती आला आहे. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे गट आणि भाजपप्रणीत सहकार आघाडीची सत्ता आली आहे. सर्व १८ जागांवर एकतर्फी विजय मिळाला असून वंचित समर्थित पॅनलला पराभवाचा धक्का बसला आहे.

अकोला बाजार समितीत सहकार आघाडीत राष्ट्रवादीला सर्वाधिक 9 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचा सभापती होणार, असं मानलं जाणार आहे.

Maharashtra APMC Election Result LIVE updates : राज्याच्या कल कोणाकडे? कोण राखणार सत्ता

अकोला बाजार समितीतील पक्षीय बलाबल :

एकूण जागा : 18

भाजप : 05
राष्ट्रवादी : 09
काँग्रेस : 02
ठाकरे गट : 02

विजयी उमेदवार पक्ष/आघाडी

विकास पागृत – ठाकरे गट
दिनकर वाघ – राष्ट्रवादी
वैभव माहोरे – भाजप
संजय गावंडे –  भाजप
चंद्रशेखर खेडकर –  राष्ट्रवादी

राजीव शर्मा – भाजप
शिरीष धोत्रे – राष्ट्रवादी
दिनकर नागे – राष्ट्रवादी
राजेश बेले – भाजप
भरत काळमेघ – भाजप
ज्ञानेश्वर महल्ले – काँग्रेस

अभिमन्यू वक्टे –  काँग्रेस
सचिन वाकोडे – राष्ट्रवादी
रामेश्वर वाघमारे – राष्ट्रवादी
शालिनी चतरकर – राष्ट्रवादी
माधुरी परनाटे – राष्ट्रवादी
मुकेश मुरूमकार – ठाकरे गट
हसन चौधरी – राष्ट्रवादी

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube