Maharashtra APMC Election Result LIVE updates : राज्याच्या कल कोणाकडे? कोण राखणार सत्ता

  • Written By: Published:
Maharashtra APMC Election Result LIVE updates : राज्याच्या कल कोणाकडे? कोण राखणार सत्ता

Market Committee Election Counting Votes : सध्या राज्यभरात बाजार समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. आज राज्यातील ग्रामीण राजकारणाचे केंद्र समजल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान पार पडलं आहे. या निवडणुकांमध्ये अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पाणाला लागली आहे. तर आज यापैकी अनेक बाजार समित्यांची मतमोजणी होणार आहे.

त्यामुळे आज मतदार कोणाला कौल देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. आज राज्यातील 95 बाजार समित्यांची मतमोजणी होणार आहे. 147 कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान पार पडलं. त्यातील 34 बाजार समित्यांची कालच मतमोजणी झाली आहे. त्याच बरोबर काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी आज मतमोजणी होणार आहे.

राज्यभरातील सर्व बाजार समित्यांचे अपडेट, एका क्लीकवर 

LIVE NEWS & UPDATES

  • 29 Apr 2023 04:02 PM (IST)

    पुणे बाजार समितीवर भाजपच्या पॅनलची सत्ता

    पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादी बंडखोर आणि भाजपच्या पॅनलची सत्ता

    भाजपच्या अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीला 18 पैकी 13 जागा मिळाल्या आहेत तर 2 जागांवर राष्ट्रवादी पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनल विजयी झाले आहेत. याशिवाय  3 जागावर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.

  • 29 Apr 2023 03:49 PM (IST)

    अशोक चव्हाणांनी गड राखला, भोकरमध्ये काँग्रेसची सत्ता कायम

    माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी आपला गड राखला आहे. भोकर कृषी उत्पन्न बाजार समितीत काँग्रेसची सत्ता कायम आहे.

    १८ पैकी १५ जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादी विजयी झाली आहे, त्यामध्ये काँग्रेस १३ तर २ जागांवर राष्ट्रवादी विजयी

    अशोक चव्हाण गटाच्या विजयामुळे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना धक्का बसला आहे. महाराष्ट्रात प्रवेश करायला तयारी करत असलेली बीआरएसला देखील काहीही यश आलं नाही.

  • 29 Apr 2023 03:47 PM (IST)

    उस्मानाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपाचे वर्चस्व कायम

    धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा ठिकाणची प्रमुख अशी बाजार समिती भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या ताब्यात होती. या निवडणुकीत पक्षांतरानंतर आपलं वर्चस्व कायम राखण्यात आमदार राणा पाटील यांना यश मिळाले आहे.

    आमदार राणा पाटील व शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. महायुतीने १८ पैकी १७ जागा जिंकत राणा पाटील यांनी वर्चस्व कायम ठेवले, तर महाविकास आघाडीला व्यापारी मतदारसंघाची १ जागा मिळाली.

  • 29 Apr 2023 03:45 PM (IST)

    आमदार राजळे गटाचे १८ पैकी १५ जागेवर वर्चस्व

    पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समिती मतमोजणी निकाल अपडेट

    आमदार मोनिका राजळे गटाचे १८ पैकी १५ जागेवर वर्चस्व

  • 29 Apr 2023 01:18 PM (IST)

    गंगाखेड बाजार समिती महाविकास आघाडीच्या ताब्यात

    परभणी जिल्हातील गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समिती महाविकास आघाडीच्या ताब्यात गेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार डॉक्टर मधुसूदन केंद्रे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने जिंकल्या 18 पैकी 11 जागा जिंकल्या आहेत.

    भाजपा आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या पॅनलचा मधुसूदन केंद्रे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने पराभव केला आहे.

  • 29 Apr 2023 01:10 PM (IST)

    सांगलीमध्ये महाविकास आघाडीची सत्ता; जयंत पाटलांनी गड राखला

    राजकीय दृष्ट्या महत्वाची असलेल्या सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीची सत्ता राखण्यात यश आलं आहे. एकूण १८ पैकी १७ जागांवर महाआघाडीच्या उमेदवारांचा विजयी झाला असून एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे.

    पण सांगलीमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. सांगली निवडणुकीत मंत्री सुरेश खाडे, खासदार संजयकाका पाटील, माजी आमदार विलासराव जगताप यांची लागली होती प्रतिष्ठा पणाला लागली होती. पण त्यांना यात यश आलं नाही.

    राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विश्वजीत कदम, अजित घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने दणदणीत विजय मिळवला आहे.

  • 29 Apr 2023 01:07 PM (IST)

    हवेली बाजार समितीत चुरस आणखी शिगेला

    पुणे जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या हवेली बाजार समितीच्या निवडणुकीत ग्रामपंचायत गटात धक्कादायक निकाल लागला आहे. सुरुवातीच्या निकालात ग्रामपंचायत गटातील चारपैकी दोन गटात भाजपने तर दोन गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे.

    ग्रामपंचायत गटातून सर्वपक्षीय अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी पॅनेलमधील सुदर्शन जयप्रकाश चौधरी व रवींद्र नारायणरावर कंद या दोघांनी बाजी मारली आहे. याच गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अण्णासाहेब मगर सहकार पॅनेलचे रामकृष्ण हेमचंद्र सातव व आबासाहेब कोंडीबा आबनावे हे दोन उमेदावर विजयी झाले आहेत.

     

    Maharashtra APMC Election Result LIVE updates : राज्याच्या कल कोणाकडे? कोण राखणार सत्ता

  • 29 Apr 2023 01:06 PM (IST)

    बारामती राष्ट्रवादीकडेच

    नुकत्याच आलेल्या निकालानुसार बारामतीचा गड राष्ट्रवादीने राखला आहे. सध्या चालू असलेल्या मतमोजणीनुसार राष्ट्रवादीचे १८ उमेदवार आघाडीवर आहेत. त्यामुळे सर्वच जागा जिंकत राष्ट्रवादीने भाजपला धक्का दिला आहे.

     

    Maharashtra APMC Election Result LIVE updates : राज्याच्या कल कोणाकडे? कोण राखणार सत्ता

  • 29 Apr 2023 01:06 PM (IST)

    पारनेरमध्ये Sujay Vikhe गटाचा धुव्वा, लंके-औटी गटाने मारली बाजी

    पारनेर मध्ये १८ पैकी १५ जागा महाविकास आघाडीला मिळाल्या आहेत. त्यामुळे या बाजार समितीवर महाविकास आघाडीची सत्ता आली आहे. तीन जागांची मतमोजणी सुरू असून, त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहेत.

    पारनेरमध्ये Sujay Vikhe गटाचा धुव्वा, लंके-औटी गटाने सर्व जागा जिंकल्या

  • 29 Apr 2023 12:30 PM (IST)

    नगर कृषी उत्पन्न बाजार समिती : अठरा जागांपैकी बारा जागा कर्डिले गटाने जिंकल्या

    नगर कृषी उत्पन्न बाजार समिती पुन्हा एकदा जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले (shivaji kardile) यांच्या ताब्यात आली आहे. चौथ्यांदा कर्डिले गटाची सत्ता या बाजार समितीमध्ये आलेली आहे. आतापर्यंत झालेल्या मतमोजणीत अठरा जागांपैकी बारा जागा कर्डिले गटाने जिंकल्या आहेत. उर्वरित सहा जागांवर मतमोजणी सुरू आहे.

    Shivaji Kardile यांनी मैदान मारले ! आमदार तनपुरे, लंके, गाडे ‘चितपट’

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube