पारनेरमध्ये Sujay Vikhe गटाचा धुव्वा, लंके-औटी गटाने सर्व जागा जिंकल्या
Apmc Election Parner: राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीत खासदार सुजय विखे गटाला मोठा धक्का बसला होता. तसाच धक्का पारनेर बाजार समिती निवडणुकीत विखे गटाला बसला आहे. या बाजार समितीत विखे गटाला मतदारांना सपशेल नाकारले आहे. सर्व अठरा जागा महाविकास आघाडीला मिळाल्या आहेत. त्यामुळे या बाजार समितीवर महाविकास आघाडीची सत्ता आली आहे. विखे यांनी ताकद लावूनही त्यांना एकही ताकद लावता आलेली नाहीत.
APMC Election : अमरावतीत यशोमती ठाकूर यांचंच वर्चस्व, रवी राणा-भाजप गटाला आतापर्यंत एकही जागा नाही
पारनेर बाजार समिती ही राष्ट्रवादी-काँग्रेसच्या ताब्यात होती. ही बाजार समिती हिसकाविण्यासाठी खासदार सुजय विखे यांनी जोरदार ताकद लावली होती. जिल्हा परिषदे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांच्यासह स्थानिक भाजप नेते हे सुजय विखे यांच्याबरोबर होते. या ठिकाणी विखे फॅक्टर चालेल असे बोलले जात होते. महाविकास आघाडीमध्ये ऐक्य होणार नाही, असेही बोलले जात होते. राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके आणि ठाकरे गटाचे माजी आमदार विजय औटी हे एकत्र आले. त्यामुळे महाविकास आघाडीची ताकद वाढली होती.
धनंजय मुंडेंनी गुलाल उधळला ! अंबाजोगाई बाजार समितीवर एकहाती सत्ता
खासदार सुजय विखे यांना पारनेर तालुक्यात रोखण्यासाठी लंके व औटी हे एकत्र आले असल्याची राजकीय चर्चा होती. त्यात खासदार विखे व आमदार निलेश लंके यांच्यामध्ये जोरदार राजकीय आरोप-प्रत्यारोप पाहिला मिळाले होते. या निवडणुकीत मात्र विखे गटाला मतदारांनी नाकारले आहे. विखे फॅक्टर राहुरीपाठोपाठ पारनेरमध्ये अपयशी ठरले आहे.
https://www.youtube.com/watch?v=g98vZVdv1yY