APMC Election : अमरावतीत यशोमती ठाकूर यांचंच वर्चस्व, रवी राणा-भाजप गटाला आतापर्यंत एकही जागा नाही

  • Written By: Published:
APMC Election : अमरावतीत यशोमती ठाकूर यांचंच वर्चस्व, रवी राणा-भाजप गटाला आतापर्यंत एकही जागा नाही

APMC Election : सध्या राज्यभरात बाजार समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. आज राज्यातील ग्रामीण राजकारणाचे केंद्र समजल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान पार पडलं. या निवडणुकांमध्ये अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. तर आज यापैकी अनेक बाजार समित्यांची मतमोजणी होत आहे.

या दरम्यान अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचीही मतमोजणी सुरु आहे. आतापर्यंत हातात आलेल्या निकालाननुसार आमदार यशोमती ठाकूर यांचच वर्चस्व इथे पाहायला मिळत आहे.

Maharashtra APMC Election Result LIVE updates : राज्याच्या कल कोणाकडे? कोण राखणार सत्ता

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एकूण १८ पैकी ८ जागा काँगेसला मिळाल्या आहेत. तर आमदार रवी राणा-भाजप गटाला आतापर्यंत एकही जागा जिंकता आलेली नाही. त्यामुळे अमरावतीत यशोमती ठाकूर यांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू आहे.

काँगेसचे उमेदवार मिलींद तायडे, प्रकाश काळबांडे, राम खरबडे व प्रवीण अळसपुरे या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. मतमोजणी केंद्राबाहेर यशोमती ठाकूर यांचे समर्थक जल्लोष करत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube