ऐन निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना कोरोना; पोस्ट करत म्हणाले मी पुन्हा येईन…

ऐन निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना कोरोना; पोस्ट करत म्हणाले मी पुन्हा येईन…

Joe Biden Corona positive during US presidential Election 2024 : संपूर्ण जगाचे लक्ष सध्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी (US presidential Election 2024) होणाऱ्या निवडणुकीकडे लागले आहे. मात्र या निवडणुकीच्या धामधुमीमध्येच अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन (Joe Biden) यांना कोरोनाची लागण (Corona positive) झाली आहे. याबद्दल त्यांनी स्वतः त्यांच्या एक्स अकाउंटवरून ही माहिती दिली.

खाजगी क्षेत्रातील आरक्षण विधेयकाला स्थगिती; प्रचंड विरोधानंतर कर्नाटक सरकारचा यु टर्न!

या पोस्टमध्ये जो बायडन यांनी सांगितलं की माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मात्र माझी प्रकृती उत्तम असून माझ्यासाठी केलेल्या प्रार्थनांसाठी सर्वांचे आभार. सध्या मी स्वतःला क्वारंटाईन करून घेतलं आहे. मात्र जसजसा मी बरा होईल. तसा पुन्हा एकदा अमेरिकन लोकांसाठी काम करत राहील. असे या पोस्टमध्ये बायडन म्हणाले आहेत.

दरम्यान या निवडणुकीआधी विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात सामना होणार आहे. यासाठी यांच्यात पाहिली प्रेसिडेंशीअल डिबेट झाली. दोन्ही नेत्यांनी जवळपास 75 मिनिटे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले आणि वैयक्तिक टीकाही केली. यानंतर आता दुसरी डिबेट सप्टेंबर महिन्यात होणार आहे. अमेरिकी लोकतांत्रिक व्यवस्थेत प्रेसिडेंशीअल डिबेट एक महत्त्वाचा भाग मानला जातो. या चर्चेत दोन्ही उमेदवार एकमेकांच्या उणीवा नागरिकांसमोर आणण्याचा भरपूर प्रयत्न करतात.

शेकापला जनाधार नाही, जयंत पाटलांनी राष्ट्रीय पक्षात विलीन व्हावं; शिंदेंच्या आमदाराचा सल्ला

अमेरिकी राष्ट्रपती निवडणूक भारतातील लोकसभा निवडणुकीपेक्षा खूप वेगळी आहे. भारतात राजकीय पक्ष निवडणूक बहुमत मिळवण्याचा प्रयत्न करतात. बहुमत असणाऱ्या पक्षाचे खासदार आपला नेता निवडतात. हा निवडलेला नेता पुढे पंतप्रधान बनतो. अमेरिकेत नेमके या उलट आहे. येथील रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक हे दोन पक्ष राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या निवडीसाठी सुद्धा लोकांमध्ये जातात. अमेरिकेत द्विदलीय व्यवस्था आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube