शेकापला जनाधार नाही, जयंत पाटलांनी राष्ट्रीय पक्षात विलीन व्हावं; शिंदेंच्या आमदाराचा सल्ला
Shivsena MLA Mahendra Dalavi advice to Jayant Patil : नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये शेकापच्या जयंत पाटील (Jayant Patil) यांचा पराभव झाला. त्यामुळे जयंत पाटलांनी त्यांचा पक्ष राष्ट्रीय पक्षात विलीन करावा. असा सल्ला शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार (Shivsena MLA) महेंद्र दळवी (Mahendra Dalavi ) यांनी दिला आहे.
यावर बोलताना दळवी म्हणाले की, जयंत पाटील यांच्या शेकाप पक्ष म्हणजे जनाधार हरवलेला पक्ष आहे. त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडी बरोबर जावं की नाही जावं हा त्यांचा व्यक्तिगत विषय आहे. मात्र ते पराभवानंतर कुणावरही विश्वास ठेवत नाहीयेत. शरद पवारांची मतं फुटल्याचा देखील दावा त्यांनी केला. त्यामुळे त्यांनी कोणत्यातरी राष्ट्रीय पक्षांमध्ये विलीन व्हावं. विझणारा दिवा ज्याप्रमाणे फडफड करतो.
तशी अवस्था त्यांच्या पक्षाची आहे. तसेच त्यांची सत्ता न राहिल्याने कार्यकर्ते देखील त्यांची साथ देणार नाहीत. तसेच पुढे देखील त्यांच्या पक्ष उभारी घेणार नाही. त्यामुळे शरद पवार यांच्याशी त्यांची जवळीक पाहता त्यांनी पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये विलीन व्हावं. असा सल्ला देखील दळवी यांनी दिला.
शेकाप पक्षाचा हा अंत आहे. जनसामान्य लोकांमध्ये त्यांच्या पक्षाची क्रेझ संपली आहे. राज्यात त्यांचा एकच आमदार आहे. त्याचं देखील मतपरिवर्तन झालेलां आहे. तसेच विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्यांना मिळालेली 11 मतं ही देखील लक्ष्मी दर्शनामुळे मिळालेली होती. तर या पराभवानंतर त्याचा कार्यकर्त्यांना उभारी देण्यासाठी मेळावे घेत आहेत. मात्र त्यांनी कुटुंबाव्यतिरिक्त कार्यकर्त्यांचा हित कधीही पाहिलेले नाही. असा आरोप देखील यावेळी दळवी यांनी केला.