जनतेनं नाकारलं तरीही जिंकले.. अमेरिकेच्या ‘या’ पाच राष्ट्राध्यक्षांचा किस्साच खास!

जनतेनं नाकारलं तरीही जिंकले.. अमेरिकेच्या ‘या’ पाच राष्ट्राध्यक्षांचा किस्साच खास!

US Elections 2024 : अमेरिकेत पुढील नोव्हेंबर महिन्यात राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार आहे. विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर कमला हॅरिस मैदानात (Kamala Harris) उतरल्या आहेत. यंदा माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि कमला हॅरिस यांच्यात लढत होणार आहे. निवडणुकीत ज्या उमेदवाराला (US Elections 2024) जास्त मते मिळाली त्याला विजयी घोषित केले जाते. अशीच पद्धत आहे. पण अमेरिकेच्या निवडणुकीत लोकांची जास्त मते मिळवलेला उमेदवार कदाचित पराभूतही ठरू शकतो. हे ऐकून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण असे घडू शकते. यामागे कारण आहे. अमेरिकेत मतदार थेट राष्ट्रपतींची निवड करत नाहीत. हा निर्णय इलेक्टोरल कॉलेजच्या माध्यमांतून घेतला जातो.

जगातील सर्वात जुन्या लोकशाही देशांपैकी एक असलेल्या अमेरिकेत (USA) पुढील महिन्यात निवडणूक होणार आहे. 5 नोव्हेंबर रोजी राष्ट्रपती निवडणूक आहे. वरवर विचार केला तर असेच वाटेल की अमेरिकेतील मतदार राष्ट्रपतींची निवड करतात पण ही गोष्ट दिसते तितकी सोपी नाही. अमेरिकेतील निवडणूक थोडी गुंतागुंतीची आहे. अमेरिकेत जनता थेट राष्ट्रपतींची निवड करत नाही. तर काही लोकांची निवड केली जाते. त्यांना इलेक्टर्स (प्रतिनिधी) म्हटले जाते. या प्रतिनिधींची एकूण संख्या 538 इतकी असते. यालाच अमेरिकेत इलेक्टोरल कॉलेज असेही म्हटले जाते. याच कॉलेजकडून राष्ट्रपतींची निवड केली जाते.

अशा प्रकारे राष्ट्रपती होण्यासाठी 270 इलेक्टोरल मतांची गरज असते. पण यात आणखी एक पेच आहे. तो म्हणजे या प्रतिनिधींना ते कोणत्या उमेदवाराचे अथवा पक्षाचे समर्थन करत आहेत हे स्पष्ट सांगावे लागते. परंतु निवडणुकीनंतर अनेकदा असे दिसून आले आहे की हे इलेक्टर्स त्यांच्या आधीच्या अंदाजावरून बदलले आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत उमेदवाराला जनतेची सर्वाधिक (लोकप्रिय मते) मते मिळाली तरी तोच उमेदवार विजयी होईल याची शाश्वती नाही.

भारत आणि चीनमध्ये मोठा करार! सीमावादावर नेमका काय निर्णय झाला? वाचा सविस्तर…

अमेरिकेत आतापर्यंत 59 राष्ट्रपती निवडणुका झाल्या आहेत. या निवडणुकीच्या इतिहासात पाच राष्ट्रपती असे होते ज्यांना जनतेची मते जास्त मिळाली नंतर मात्र इलेक्टोरल कॉलेजने दुसऱ्याच उमेदवाराला राष्ट्रपती घोषित केले. अशी करामत करणाऱ्या राष्ट्रपतींमध्ये जॉन क्वीन्सी ॲडम्स, रदरफोर्ड बी. हायेस, बेंजामिन हॅरिसन, जॉर्ज डब्ल्यू बुश आणि डोनाल्ड ट्रम्प यांचा समावेश आहे.

जॉन क्विसी अॅडम्स्

सन 1824 मधील राष्ट्रपती निवडणुकीत सर्वात आधी हा कारनामा झाला. या निवडणुकीत अँड्र्यू जॅक्सन, जॉन क्वीसी अॅडम्स, विलियम क्रॉफर्ड आणि हेनरी क्ले यांच्यात मुख्य लढत होती. निवडणुकीत जॅक्सन यांना सर्वाधिक पॉप्युलर मते मिळाली. तसेच अन्य प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या तुलनेत इलेक्टोरल मतांमध्येही त्यांनी आघाडी घेतली होती. जॅक्सन यांनी एकूण 99 इलेक्टोरल मते घेतली होती. बहुमतासाठी त्यांना 131 मतांची गरज होती. बाकी तीन उमेदवारांत अॅडम्स यांना 84, क्रॉफर्ड यांना 41 तर हेनरी क्ले यांना 37 इलेक्टोरल मते मिळाली.

चारही उमेदवार बहुमतापासून बरेच मागे होते. अशावेळी हे प्रकरण हाऊस ऑफ रीप्रेझेंटेटीवकडे गेले. अशा प्रकारे अमेरिकी संविधानातील 12 व्या संशोधनानुसार टॉप 3 उमेदवारांची निवड करण्यात आली. या उमेदवारांच्या नावावर मतदान घेण्यात आले. हे मतदान राज्याच्या आधारावर झाले. येथे प्रत्येक राज्याचे एक मत होते. त्यावेळी अमेरिकेत 24 राज्ये होती. तेव्हा विजयी होण्यासाठी 13 मतांची गरज होती. हेनरी क्ले यांच्याकडे फक्त 37 इलेक्टोरल मते होती. त्यामुळे क्ले या स्पर्धेतून बाहेर पडले. मतदानानंतर अॅडम्स यांना राष्ट्रपती म्हणून निवडण्यात आले.

रदरफोर्ड बी. हायेस

सन 1876 मधील राष्ट्रपती निवडणूक अमेरिकच्या इतिहासात सर्वात वादग्रस्त ठरली. या निवडणुकीतही 1824 प्रमाणेच पेच निर्माण झाला होता. मतदारांऐवजी काँग्रेसला राष्ट्राध्यक्षाची निवड करावी लागली. या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे रदरफोर्ड बी. हायेस आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे सॅम्युएल टील्डेन आमनेसामने होते. मतमोजणीनंतर टिल्डेन यांना 42 लाख पॉप्युलर मते मिळाली. तर हायेस यांना 40 लाख मते मिळाली. तसेच टिल्डन यांना 184 इलेक्टोरल मते मिळाली तर हायेस यांना 165 मते मिळाली. वीस मतांचा वाद निर्माण झाला होता.

Israel-Hamas : इस्त्रायली सैनिकांना खंदकातून घबाड नाही, तर खजिना सापडला…

ही 20 मते चार राज्यांतील होती. यामध्ये फ्लोरिडा 4, लुईझियाना 8, साऊथ कॅरोलिना 7 आणि ओरेगॉन राज्याच्या एका मताचा समावेश होता. दोन्ही पक्षांनी त्यांच्या उमेदवारांच्या विजयाचा दावा केला होता. त्यामुळे ही 20 मते कुणाच्या खात्यात गेली पाहिजेत यावरून वाद निर्माण झाला होता. नंतर यामध्ये काँग्रेसने एक 15 सदस्यांची समिती नेमली. या समितीत 8 सदस्य रिपब्लिकन तर 7 सदस्य डेमोक्रॅटस होते. या कमिटीने 20 मते हायेस यांना देऊन टाकली. हायेस फक्त एक मताने निवडणूक जिंकले. कमिशनने हायेस यांनाच राष्ट्रपती म्हणून का निवडले असा प्रश्न पडला असेल. काही राजकीय इतिहासकार असे मानतात की दोन्ही पक्षात एक सिक्रेट डील झाली होती. त्यानुसार हायेस प्रेसिडेंट बनले.

बेंजामिन हॅरिसन

या निवडणुकीत प्रेसिडेंट ग्रोवल क्लीव्हलँड आणि रिपब्लिकन उमेदवार बेंजामिन हॅरिसन यांच्यात सरळ लढत होती. दोन्ही पक्षांनी पैशांच्या बदल्यात मत यासारखे चुकीचे काम केल्याचा आरोप झाला होता. दक्षिणेतील राज्यांत डेमोक्रॅटस तर पूर्व आणि पश्चिम भागात रिपब्लिकनना विजय मिळाला. क्लीव्हलँड यांना हॅरिसन यांच्या तुलनेत 90 पॉप्युलर मते जास्त मिळाली. इलेक्टोरल मतांमध्ये मात्र हॅरिसन यांनी आघाडी घेतली. हॅरिसन यांना 233 तर क्लीव्हलँड यांना 168 मते मिळाली होती. नंतर हॅरिसन अमेरिकेचे 23 वे राष्ट्राध्यक्ष झाले.

जॉर्ज डब्ल्यू बुश

बेंजामिन हॅरिसन यांचा इतिहास 112 वर्षांनी पुन्हा घडला. सन 2000 मध्ये या इतिहासाची पुनरावृत्ती झाली होती. नोव्हेंबर महिन्यात मतदान झाले. या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे जॉर्ज डब्ल्यू बुश आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे अल गोर यांच्यात लढत होती. गोर बिल क्लिंटन यांच्या काळात उपराष्ट्रपती होते. ओरेगन, न्यू मेक्सिको आणि फ्लोरिडामध्ये गुंता वाढला. फ्लोरिडात दोनदा मतमोजणी झाली. वाद इतका वाढला की या प्रकरणाची सुनावणी फ्लोरिडा कोर्टात झाली. येथेही काही घडले नाही म्हणून प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात पोहोचलं. 9 पैकी जॉर्ज बुश यांच्या बाजूने 5 आणि गोर यांच्या बाजूने 4 राहिले. इलेक्टोरल कॉलेजमध्ये जॉर्ज बुश यांना 271 आणि गोर यांना 266 मते मिळाली. गोर यांना 5 लाखांपेक्षा जास्त पॉप्युलर मते मिळाली होती.

सहा महिन्यांत ६० हजार कोटी, बांग्लादेशच्या संकटात भारताची चांदी; कापड उद्योगाला बूस्टर..

डोनाल्ड ट्रम्प

सन 2016 मधील राष्ट्रपती निवडणूक. रिपब्लिकन नेते डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्यात थेट लढत होती. निवडणुकीच्या आधी झालेल्या विविध सर्वेत हिलरी क्लिंटन विजयी होतील याची 90 टक्के शक्यता व्यक्त करण्यात आली होती. निकालात डोनाल्ड ट्रम्प पॉप्युलर मतांमध्ये पिछाडीवर राहिले. या हवाल्याने क्लिंटन यांना 28 लाख मतांची आघाडी होती. त्यांनी न्यूयॉर्क आणि कॅलिफोर्नियात चांगली कामगिरी केली. पण विस्कॉन्सिन, पेन्सिल्वेनिया, मिशिगन या राज्यांत कमी अंतराने का होईना पण ट्रम्प पुढे निघून गेले. यानंतर इलेक्टोरल कॉलेजची गणना करण्यात आली. यात डोनाल्ड ट्रम्प यांना 304 आणि हिलरी क्लिंटन यांना 227 मते मिळाली आणि ट्रम्प यशस्वी झाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube