Israel-Hamas : इस्त्रायली सैनिकांना खंदकातून घबाड नाही, तर खजिना सापडला…
Israel-Hamas : मागील अनेक दिवसांपासून इस्त्रायली आणि दशतवादी संघटना हिज्बुल्लामध्ये (Israel-Hamas) जोरदार युद्ध सुरु आहे. अशातच इस्त्रायली सैनिकांना एका रुग्णालयाखाली खंदक सापडलं असून या खंदकात घबाड नाही तर रोकड आणि सोने सापडले आहे. यामध्ये सुमारे 50 कोटी डॉलरची रोकडी सापडली असून विशेष म्हणजे यामध्ये 4 हजार कोटींचं भारतीय मुल्य आढळून आले आहे.
‘मविआ’ चा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरेंना मिळणार ‘इतक्या’ जागा
या गुप्त खंदकाची निर्मिती हिज्बुल्ला संघटनेचा म्होरक्या नसरल्लाने केलीयं. या खंदकातील रोकड आणि सोन्याचा वापर दहशतवादी कारवाई करण्यासाठी केला जात असल्याचा दावा इस्त्रायली सैनिकांकडून करण्यात आलायं. इस्त्रायली आणि लेबनॉनची दहशतवादी संघटना हिज्लबुल्ला यांच्यात जोरदार संघर्ष सुरु आहे. मागील महिन्यातच इस्त्रायलकडून युद्धाची मोहिम आखण्यात आलीयं. पेजरवर हल्ले करत इस्त्रायलकडूनही प्रत्युत्तर दिलं जातंय.
महाविकास आघाडीत कोणत्या जागांवर वाद? बाळासाहेब थोरात आणि अनिल देसाईंनी केलं चित्र स्पष्ट, म्हणाले…
जमिनीवरुन कारवाई सुरु असतानाच इस्त्रायली सैनिकांनी लेबनॉनमधील काही भागांचा ताबा घेतलायं. या ताब्यानंतर सैनिकांनी झडती सुरु केली. या झडतीमध्ये इस्त्रायली सैनिकांना एका रुग्णालयाच्या खाली खंदक आढळून आले आहे.
दुभंगलेल्या बालेकिल्ल्यात शिवसेनेत होणार मुख्य लढत; छत्रपती संभाजीनगर शहरात कोण बाजी मारणार?
50 कोटी डॉलर अन् सोने सापडले…
दक्षिण बैरूत येथील अल सालेह रुग्णालयाच्या खंदकात ५० कोटी डॉलरची रोकड आणि सोने सापडले. या पैशातून लेबनॉन देशाची पुनर्उभारणी करता येऊ शकते. इस्त्रायली सैनिकांनी हिज्बुल्ला संघटनेच्या आर्थिक ठिकाणांवर हल्ले केले. कडक सुरक्षा व्यवस्था असणारी ही गोपनीय जागा इस्राईल सैनिकांच्या रडारवर होती. ही एक भूमिगत तिजोरी असून त्यात रोकड, सोन्याच्या रूपातून अब्जावधी रुपये ठेवण्यात आले होते. या पैशाचा वापर हिज्बुल्ला संघटनेकडून इस्राईलवर हल्ला करण्यासाठी केला जात असल्याचं आयडीएफचे प्रवक्ते रिअर ॲडमिरल डॅनियल हगारी यांनी सांगितलंय.