‘मविआ’ चा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरेंना मिळणार ‘इतक्या’ जागा

  • Written By: Published:
‘मविआ’ चा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरेंना मिळणार ‘इतक्या’ जागा

MVA Seat Sharing: गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये (MVA) जागावाटपावरून बैठका सुरु आहे मात्र जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये कोणता पक्ष किती जागांवर उमेदवार देणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे काही मीडिया रिपोर्ट्सनुसार महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असून 25 ऑक्टोबरपर्यंत जागावाटपाची घोषणा करण्यात येणार आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळणार आहे. माहितीनुसार, काँग्रेस 103 ते 108 जागांवर निवडणूक लढवू शकते तर उद्धव ठाकरेंची शिवसेना 90 ते 95 आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) 80 ते 85 जागांवर निवडणूक लढवणार आहे तर 3 ते 6 जागा मित्र पक्षांना देण्यात येणार असल्याचा दावा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात येत आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यात जागावाटपावरुन शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांना जागावाटपाबाबत उद्धव ठाकरे (Sharad Pawar) आणि शरद पवार (Uddhav Thackeray) यांच्याशी चर्चा करण्याचे आदेश काँग्रेस नेतृत्त्वानं दिले होते. सध्या माहितीनुसार, बाळासाहेब थोरात यांना महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा सोडवण्यात यश आला आहे.

माहितीनुसार, विदर्भातील काही जागांवरून काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये मोठा वाद निर्माण झाला होता आणि त्यानंतर नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती. त्यामुळे काँग्रेस नेतृत्त्वानं पटोले यांच्या जागी चर्चेची जबाबदारी बाळासाहेब थोरात यांच्याकडे दिली होती.

महाविकास आघाडीत फुट?; जयंत पाटलांनी चौकार मारत जाहीर केली कोकण पट्ट्यातील उमेदवारांची नावं

माहितीनुसार, काँग्रेस विदर्भात सर्वाधिक जागा लढवणार आहे तर शिवसेना मुंबई, ठाणे, कोकण, मराठवाड्यात जास्त जागा लढवणार आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस पश्चिम महाराष्ट्रात सर्वात जास्त जागा लढवणार असल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात येत आहे. मात्र याबाबात अधिकृत माहिती समोर आलेली नाही. 25 ऑक्टोबरपर्यंत महाविकास आघाडीकडून पहिली यादी जाहीर होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube