मविआमध्ये मिठाचा खडा! ठाकरेंना नाना पटोलेंचं वावडं, थेट बैठकांवरचं बहिष्काराचा इशारा

नाना पटोले (Nana Patole) यापुढे जागावाटपाच्या बैठकीत आल्यास शिवसेना ठाकरे गटनेते (UBT) जागावाटपाच्या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत

  • Written By: Published:
Mahavikas Aghadi

Mahavikas Aghadi Seat allocation : विधानसभा निवडणुकीची (Vidhansabha Election) घोषणा होताच राजकीय घडामोडी वेगाने सुरु झाल्या. मात्र, जागावाटपावरून महाविकास आघाडीमधील (Mahavikas Aghadi) वाद आता विकोपाला पोहोचला. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यापुढे जागावाटपाच्या बैठकीत आल्यास शिवसेना ठाकरे गटनेते (UBT) जागावाटपाच्या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत, अशी भूमिका ठाकरे गटाने घेतली. त्यामुळं मविआत बिघाडी निर्माण झाली.

अभिनेता अंकित मोहनचा ‘पैलवान’ लुक चर्चेत! सोशल मीडियावर प्रोमो प्रदर्शित

मविआकडून 260 जागांवर बोलणी पूर्ण झाल्याचा दावा करण्यात येत असला तरी अजूनही 25 ते 30 जागांवर अजूनही जोरदार रस्सीखेच सुरू आहे. विदर्भातील जागांबाबतही काँग्रेस आणि ठाकरे गटात वाद झाल्याची चर्चा आहे. ठाकरे गट विदर्भातील वाढीव जागांसाठी आग्रही आहे. मात्र, नाना पटोले यांनी विदर्भातील जागा न सोडण्याचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे कालच्या बैठकीत संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यात खडके उडाल्याची चर्चा आहे.

महायुतीत तणाव! गणपत गायकवाडांना उमेदवारी दिल्यास अपक्ष लढेल, महेश गायकवाडांचा इशारा 

जागावाटपाची चर्चा पुढे जात नसल्याने ठाकरे गटाने नाना पटोले यांच्या विरोधात थेट काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केल्याचे सूत्रांनी सांगितले. विदर्भातील काही जागांवर तिढा अद्याप सुटलेला नाही, विदर्भातील तिढा असलेल्या जागांवर पटोले अडून बसले. त्यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत जागावाटपात अडथळे येत असल्याची तक्रार ठाकरेंच्या नेत्यांनी केली.

दरम्यान, तिढा असलेल्या जागा लवकरात लवकर सोडण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न केले जावे, अशी भूमिका ठाकरेंच्यचा शिवसेनेची आहे. मात्र, नाना पटोले यांच्या भूमिकेवरून आणि सहभागावरून आता महाविकास आघाडीत बिघाडी होत असल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे आता मविआतकील जागा वाटपाचा वाद कसा मिटतो, हेच पाहणं महत्वाचं आहे.

follow us