भारत आणि चीनमध्ये मोठा करार! सीमावादावर नेमका काय निर्णय झाला? वाचा सविस्तर…

भारत आणि चीनमध्ये मोठा करार! सीमावादावर नेमका काय निर्णय झाला? वाचा सविस्तर…

New Agreement Between India and China : भारत आणि चीनच्या सीमावादावर परराष्ट्र मंत्रालयाने मोठी माहिती दिलीय. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी महत्त्वाची माहिती यासंदर्भात दिली (India and China LAC Issue) आहे. त्यांनी सांगितलंय की, गेल्या अनेक आठवड्यांपासून भारत-चीनमध्ये राजनैतिक आणि लष्करी चर्चा सुरू होती. पूर्व लडाखमधील सीमावादाच्या मुद्द्यावर भारत आणि चीनमध्ये करार झालाय. LAC वर गस्तीबाबत भारत आणि चीन यांच्यात करार (India and China LAC Issue) झालाय. चीनसोबत अनेक प्रश्न सोडवण्यात आले आहेत. पेट्रोलिंगवर सहमती झाल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव कमी झालाय.

परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी सांगितलं की, LAC वर वेगवेगळ्या ठिकाणी गस्त घालण्याची व्यवस्था करण्यात आलीय. यामुळे सैनिकांना माघार घ्यावी लागली आहे. चीनसोबतचे अनेक प्रश्नही सोडवण्यात आले (Agreement Between India and China) आहेत. यासोबतच त्यांनी ब्रिक्स शिखर परिषदेचीही माहिती दिली. त्यात संस्थापक सदस्यांसोबतच नवीन सदस्यांचाही समावेश करण्यात येणार असल्याचे मिस्त्री यांनी सांगितलं आहे.

India China Relations : सीमावादावर जयशंकर व चीनचे परराष्ट्र मंत्री किन गांग यांच्यात चर्चा

शिखर परिषदेत दोन मुख्य सत्रे होणार आहेत. 22 ऑक्टोबरपासून शिखर परिषद सुरू होणार आहे. पहिल्या दिवशी नेत्यांसाठी डिनर असेल. शिखर परिषदेचा मुख्य दिवस 23 ऑक्टोबर आहे. दोन मुख्य सत्रं असतील. सकाळच्या सत्रानंतर, शिखर परिषदेच्या मुख्य विषयावर दुपारी खुलं सत्र होणार आहे. नेत्यांनी कझान घोषणेचा अवलंब करणे देखील अपेक्षित आहे, ज्यामुळे ब्रिक्सचा मार्ग मोकळा होईल. 24 ऑक्टोबरला शिखर परिषद संपणार आहे.

2020 मध्ये पूर्व लडाखमध्ये तणाव निर्माण झाला होता. आता दोन्ही देशांमध्ये गस्त व्यवस्थेबाबत झालेल्या करारामुळे हळूहळू परिस्थिती निवळत आहे. 22-23 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या 16 व्या ब्रिक्स परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रशिया दौऱ्यापूर्वी ही महत्त्वाची घडामोड घडलेली आहे. दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये नुकत्याच झालेल्या चर्चेनंतर भारत आणि चीनमध्ये पूर्व लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेवर (LAC) गस्त घालण्यासाठी करार झालाय.

China : चीनचा नवा ‘जीएसआय’ उद्योग, पाकिस्तानची चांदी; भारताला मात्र धोक्याची घंटा

मिस्री म्हणाले की, गस्तीबाबतच्या करारानंतर दोन्ही देशांमधील एलएसीवरील तणाव कमी होण्याची अपेक्षा आहे. परराष्ट्र सचिवांनी सांगितले की, पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात 15 ते16 जून 2020 रोजी भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये चकमक झाली होती. यामध्ये 20 भारतीय जवान शहीद झाले होते. तर चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने कधीही आपल्या सैनिकांची अधिकृत आकडेवारी जाहीर केली नव्हती.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या