China : चीनचा नवा ‘जीएसआय’ उद्योग, पाकिस्तानची चांदी; भारताला मात्र धोक्याची घंटा
China New Global Security Initiative Programme : चीनने बेल्ट अँड रोड प्रकल्पानंतर आणखी एक महत्वाकांक्षी प्रकल्प हाती (China) घेतला आहे. ग्लोबल सिक्युरिटी इनिशिएटिव्ह असे या संभावित प्रकल्पाचे नाव आहे. या प्रकल्पाची माहिती चीनचे परराष्ट्र मंत्री ले येचुंग यांनी मागील आठवड्यात दिली होती. या जागतिक सुरक्षा उपक्रमाची तुलना अमेरिकेच्या नेतृत्वातील नाटोशी केली जात आहे. नाटो या (NATO) संघटनेत एकूण 32 सदस्य देश आहेत यातील 30 देश एकट्या युरोपातील आहेत. नाटो संघटनेच्या कलम 5 नुसार कोणत्याही एखाद्या सदस्य देशावर संघटनेबाहेरील देशाने हल्ला केला तर या संघटनेतील सदस्य देशांवर हा हल्ला मानला जाईल, असे स्पष्ट केले आहे. युरोपनंतर आता आशियातही अमेरिकेचा प्रभाव सातत्याने वाढत चालला आहे. हीच गोष्ट चीनला खटकत आहे. त्यामुळेच चीनने नाटोसारखीच संघटना उभारण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
नाटो संघटना आशिया-पॅसिफिक प्रदेशात आपला प्रभाव वाढवू शकते अशी शंका चीनला वाटू लागल्याने हा नवा उद्योग चीनने सुरू केला आहे. चीनच्या बेल्ट अँड रोड प्रकल्पाला सध्या अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच कोरोनाचा मोठा फटका चीनला बसला आहे. या कारणांमुळे चीनची अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. अशा परिस्थितीत चीनी नागरिकांचा राग शांत करण्याचा प्रयत्न म्हणून चीनकडून हा नवा प्रकल्प सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकल्पांतर्गत चीन भारत आणि दक्षिण आशियातील अन्य देशांना स्वतःच्या व्यापक आशियाई सुरक्षा चौकटीत आणण्याचा प्रयत्न करणार आहे. भारत क्वाड संघटनेत सहभागी आहे. अमेरिकाही या संघटनेत आहे. याशिवाय अमेरिका ऑकसच्या माध्यमातून प्रशांत महासागरातही आपली उपस्थिती वाढवत आहे.
China Earthquake : चीनमध्ये दुसऱ्या दिवशीही शक्तिशाली भूकंप; घरांची पडझड, नागरिकांची पळापळ
पाकिस्तान बनणार पहिला सदस्य
चीन ग्लोबल सिक्युरिटी इनिशिएटिव्ह (जीएसआय) उपक्रमाचा पहिला सदस्य पाकिस्तान असेल असे सांगण्यात येत आहे. या उपक्रमाबाबत दोन्ही देशांत चर्चा सुरू आहे. पाकिस्तान आपल्या सुरक्षेसाठी चीनवर अवलंबून आहे. दोन्ही देशांत सध्या संरक्षण संबंध मदबूत आहेत. पाकिस्तान आणि चीनने मिळून लढाऊ विमानही विकसित केले आहे. याशिवाय पाकिस्तानी सशस्त्र दलांची बहुतांश शस्त्र चिनी बनावटीची आहेत. अशा परिस्थितीत चीनच्या विनंतीवरुन पाकिस्तान या जागतिक सुरक्षा उपक्रमाचा सदस्य होण्याची दाट शक्यता आहे.
भारतासाठी धोक्याची घंटा
चीन आणि पाकिस्तान आधीपासूनच भारताला डोकेदुखी ठरत आहेत. अशा परिस्थितीत या दोन देश नव्या उपक्रमात एकत्र आल्यास पाकिस्तानची लष्करी ताकद आणखी वाढण्याची शक्यता आहे. पाकिस्तान आधीपासूनच अशा एखाद्या लष्करी आघाडीत सहभागी होण्याचा प्रयत्न करत आहेत. चीनच्या रुपाने ही संधी चालून आली आहे. जर पाकिस्तान या आघाडीत सहभागी सहभागी झाला तर त्याला चीनची अनेक शक्तिशाली शस्त्रे आणि तंत्रज्ञान मिळण्याची शक्यता आहे. ही गोष्ट भारतासाठी निश्चितच त्रासदायक ठरू शकते.
आजारपणाच्या सुट्ट्यांनी सरकारलाच भरला ‘ताप’ ‘सीक लिव्ह’ रोखण्यासाठी PM सुनकचा प्लॅन तयार