आजारपणाच्या सुट्ट्यांनी सरकारलाच भरला ‘ताप’; ‘सीक लिव्ह’ रोखण्यासाठी PM सुनकचा प्लॅन तयार

आजारपणाच्या सुट्ट्यांनी सरकारलाच भरला ‘ताप’; ‘सीक लिव्ह’ रोखण्यासाठी PM सुनकचा प्लॅन तयार

Rishi Sunak made New Policy for Sick Leave : ब्रिटनमधील लोकांमध्ये कामचुकारपणा वाढल्याचे समोर आले आहे. याचं महत्वाचं कारण म्हणजे येथे लोक दीर्घकाळ आजारपणाच्या रजा घेत आहेत. त्यामुळे कामावर अतिशय प्रतिकूल परिणाम होत असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले आहे. आता लोकांच्या या सवयीला आळा घालण्यासाठी पंतप्रधान ऋषी सुनक यांनी पुढाकार घेतला आहे. दीर्घकालीन आजारपणाच्या रजेसाठीचे नियम अधिक कठोर करण्याचा विचार त्यांनी सुरू केला आहे. यातून लोकांना पुन्हा कामावर आणण्याचे प्रयत्न होणार आहेत.

2020 पासून सहभाग वाढलेल्या अन्य श्रीमंत देशांच्या तुलनेत दीर्घकालीन आजारांमुळे आणि विद्यार्थ्यांची जास्त संख्या यांमुळ कामगार शक्तीचा सहभाग मागील पाच वर्षांपासून अत्यंत कमी आहे. सुनक यांनी सांगितले की मानसिक आरोग्याच्या स्थितीमुळे काम न करणाऱ्या लोकांची वाढती संख्या काळजीत टाकणारी आहे. लोकांनी पुन्हा रोजगाराकडे वळावे यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण अधिक प्रयत्न करण्याच गरज आहे.

Rishi Sunak : लोकांना मरू द्या ! पीएम सुनकच्या वक्तव्यानंतर ब्रिटिश खवळले; प्रकरण काय?

अधिकृत आकडेवारीनुसार 16 ते 64 वयोगटातील सुमारे 9.4 दशलक्ष किंवा सुमारे 22 टक्के लोक एकतर काम करत नाहीत आणि तरीसुद्धा ते बेरोजगार नाहीत. जे कोरोना महामारीच्या आधी 8.55 दशलक्ष होते. यापैकी 2.8 दशलक्ष लोक दीर्घकाळ आजारी आहेत तर 2 लाख 6 हजार नागरिक तात्पुरते आजारी आहेत.

मागील वर्षी असे सांगण्यात आले होते की दीर्घकालीन आजारामुळे कामावर येत नसलेले एक चतुर्थांश लोक वैद्यकिय उपचारांसाठी वाट पाहत आहेत. जर ही प्रतिक्षा यादी काढून टाकली तरी फक्त 25 हजारच लोक असे आहेत जे पुन्हा कामावर येऊ शकत होते.

याबाबत समोर आलेल्या एका अहवालात असे म्हटले आहे की दीर्घकाळ आजारी असलेल्यांपैकी अर्ध्याहून अधिक लोकांना नैराश्य आणि अन्य मानसिक आणि शारीरिक आजारांनी ग्रासले आहे. या लोकांची काम करण्याची मानसिकताही कमी होत चालली आहे. अशा परिस्थितीत ब्रिटेन सरकारच्याही अडचणी वाढल्या आहेत.

Britain news : ब्रिटनमध्ये राहता वरून नावं ठेवता; सुनक यांनी ब्रिटनमधील स्थलांतरितांना सुनावलं

पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले की डॉक्टर या लोकांना कामावर परतण्याऐवजी मेडिकल रजा घेण्याचा सल्ला देत आहेत. त्यामुळे सुनक म्हणाले की आता आपल्यालाच धोरणात बदल करावा लागणार आहे जेणेकरून लोकांना पुन्हा कामावर रुजू करून घेता येईल. जो कर्मचारी सुट्टी घेत आहे तो खरंच काम करू शकेल का याचा विचार केला जाईल त्यानुसार त्याला काम करायला लावले जाईल.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज