मोठी बातमी! विषारी इंजेक्शन टोचून मानसोपचार तज्ज्ञ डॉ. जावरकर यांची आत्महत्या

मोठी बातमी! विषारी इंजेक्शन टोचून मानसोपचार तज्ज्ञ डॉ. जावरकर यांची आत्महत्या

Dr. Prashant Jawarkar : प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रशांत जावरकर (Dr. Prashant Jawarkar) यांनी विषारी इंजेक्शन टोचून आत्महत्या केली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अकोल्यातील (Akola) न्यू तापाडिया नगरमधील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी विषारी इंजेक्शन (Poisonous Injection) टोचून आत्महत्या केली.

डॉ. प्रशांत जावरकर गेल्या अनेक वर्षांपासून ख्यातनाम मानसोपचार तज्ज्ञ डॉ. दीपक केळकर यांच्या ‘सन्मित्र हॉस्पिटल’मध्ये कार्यरत होते. या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या डॉ. प्रशांत जावरकर यांनी आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. त्यांनी विषारी इंजेक्शन टोचून आत्महत्या केली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तर या प्रकरणात पोलिसांनी पुढील तपास सुरु केला असल्याची देखील माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Hot Air Balloon हवेतच पेटला, आठ जणांचा मृत्यू; व्हिडिओ व्हायरल 

तर दुसरीकडे समुपदेशन करणाऱ्या डॉक्टरनेच आत्महत्या केल्याने अकोला शहरातील वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून अनेक चर्चांना उधाण आले आहे.

इस्त्रायलचा सर्वात मोठा सायबर हल्ला, इराणचे 800 कोटी रुपयांचे क्रिप्टो ‘बर्न’

follow us
  • fb
  • instagram
  • youtube