इस्त्रायलचा सर्वात मोठा सायबर हल्ला, इराणचे 800 कोटी रुपयांचे क्रिप्टो ‘बर्न’

Israel Cyber Attack On Iran : गेल्या काही दिवसांपासून इस्त्रायल आणि इराणमध्ये तणाव वाढत असल्याने दोन्ही देश एकमेकांवर हल्ले करत आहे.

Israel Cyber Attack On Iran

Israel Cyber Attack On Iran : गेल्या काही दिवसांपासून इस्त्रायल आणि इराणमध्ये तणाव वाढत असल्याने दोन्ही देश एकमेकांवर हल्ले करत आहे. तर आता एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, इस्त्रायलने (Israel) इराणवर सर्वात मोठा सायबर हल्ला केला आहे. ज्यामुळे इराणचे तब्बल 800 कोटी रुपयांचे क्रिप्टो बर्न झाले आहे.

इस्रायली हॅकिंग ग्रुप ‘प्रिडेटरी स्पॅरो’ (Predatory Sparrow) ने इराणच्या (Iran) सर्वात मोठ्या क्रिप्टो एक्सचेंज नोबिटेक्समधून 90 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 800 कोटी रुपये) किमतीची क्रिप्टोकरन्सी बर्न केल्याचा दावा केला आहे.

फॉर्च्यूनच्या अहवालानुसार, दोन्ही देशांमध्ये सध्या तणाव शिगेला पोहचला असून या दरम्यान हा सायबर हल्ला झाला आहे. हॅकर्सनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर दावा केला की नोबिटेक्स दहशतवादाला आर्थिक पाठबळ देण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय निर्बंधांचे उल्लंघन करण्यासाठी एक प्रमुख साधन बनले आहे. प्रत्युत्तरादाखल, नोबिटेक्सने त्यांच्या एक्स अकाउंटवर म्हटले आहे की त्यांची बहुतेक क्रिप्टोकरन्सी कोल्ड वॉलेटमध्ये सुरक्षित आहे आणि हल्ल्यापासून अप्रभावित राहिली आहे.

‘आमी डाकिनी’ मधील भूमिकेसाठी राची शर्माने घेतली श्रद्धा कपूरकडून प्रेरणा

क्रिप्टो ॲनालिटिक्स फर्म एलिप्टिकच्या मते, प्रीडेटरी स्पॅरोने बिटकॉइन, डोगेकॉइन आणि 100 हून अधिक इतर क्रिप्टोकरन्सी चोरल्या, परंतु त्या नष्ट केल्या. हॅकर्सनी चोरी केलेले निधी ब्लॉकचेन पत्त्यांवर पाठवले ज्यामध्ये ‘F-iRGCTterrorists’ सारखे शब्द होते. IRGC म्हणजेच इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स ही इराणी सैन्याची एक शाखा आहे.

follow us