Hot Air Balloon हवेतच पेटला, आठ जणांचा मृत्यू; व्हिडिओ व्हायरल

Hot Air Balloon हवेतच पेटला, आठ जणांचा मृत्यू; व्हिडिओ व्हायरल

Hot Air Balloon : ब्राझीलमध्ये एक मोठी दुर्घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, ब्राझीलच्या (Brazil) एका भागात हॉट एअर बलूनला आग लागली ज्यामुळे 8 जणांचा मृत्यू झाला आहे. हॉट एअर बलून (Hot Air Balloon) हवेत असताना त्यात आग लागली ज्यामुळे आठ जणांचा मृत्यू झाला असून सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

एपीच्या वृत्तानुसार, शनिवारी दक्षिण ब्राझीलच्या सांता कॅटरिना राज्यात एका हॉट एअर बलूनला आग लागली आणि तो आकाशातून खाली कोसळला. या बलूनमध्ये 21 जण होते, ज्यामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला आहे. G1 ने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये हवेत एअर बलूनमध्ये आग लागल्याची दिसून येत आहे.

या दुर्घटनेबाबत माहिती देताना सांता कॅटरिनाच्या लष्करी अग्रिशमक दलाने सांगितले की, या दुर्घटनेमध्ये 13 जण वाचले तर आठ जणांचा मृत्यू झाला आहे. 13 जण वाचले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

इस्त्रायलचा सर्वात मोठा सायबर हल्ला, इराणचे 800 कोटी रुपयांचे क्रिप्टो ‘बर्न’

माहितीनुसार, यापूर्वी देखील अशीच एक दुर्घटना घडली होती. G1 ने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या रविवारी साओ पाउलो राज्यात एक एअर बलून फुटला होता ज्यामध्ये 27 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता आणि 11 जण जखमी झाले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube