Download App

Vijay Wadettiwar : पक्ष कसा फोडायचा? महाराष्ट्रात पुस्तक लिहिण्याची गरज

  • Written By: Last Updated:

राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून राष्ट्रवादीत अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा बंडाच निशाण फडकवलं आहे. अजित पवार यांनी आज (2 जुलै) शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह अन्य 9 जणांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीच्या (NCP) 40 आमदारांनी शिंदे – फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यातच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्याला दोन उपमुख्यमंत्री मिळाले आहेत. या घडामोडींवर काँग्रेसचेनेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया आली आहे. ते म्हणाले सत्तेला कुठली मर्यादा राहिलेल्या नाही. आजचा राजकीय भूकंप आहे, खरंतर आता महाराष्ट्रात पुस्तक लिहिण्याची गरज आली आहे की, पक्ष कसा फोडायचा? (Vijay Wadettiwar : How to break the party? Need to write a book in Maharashtra)

राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून राष्ट्रवादीत अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा बंडाच निशाण फडकवलं आहे. अजित पवार यांनी आज (2 जुलै) शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह अन्य 9 जणांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीच्या (NCP) 40 आमदारांनी शिंदे – फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यातच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्याला दोन उपमुख्यमंत्री मिळाले आहेत. या घडामोडींवर काँग्रेसचेनेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया आली आहे. ते म्हणाले सत्तेला कुठली मर्यादा राहिलेल्या नाही. आजचा राजकीय भूकंप आहे, खरंतर आता महाराष्ट्रात पुस्तक लिहिण्याची गरज आली आहे की, पक्ष कसा फोडायचा?

यावर पुढे बोलताना वडेट्टीवार म्हणतात पक्ष चालवत असताना पक्षातील काही लोक समाधानी नसतात. आजही तेच घडले, पक्षप्रमुख पक्ष सांभाळण्याच काम करतात. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस म्हणजेच ईडीचे हे सरकार आहे. आता ईडीअ (एकनाथ, देवेंद्र, अजित) म्हणण्याची वेळ आलेली आहे. केंद्रीय यंत्रणांचा धाक दाखवून वाटेल त्या पद्धतीने सत्ता मिळवणे आणि टिकवणे अशी टीका यावेळी विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर केली.

महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला पातळी तोडण्याचे काम सध्या सुरू आहे. कोणालाही समाधान मिळालं असलं तरी महाराष्ट्रातील जनतेला यातून समाधान मिळणार नाही. अशा राजकारणाला जनता काय धडा शिकवेल? हे येणारा काळ सांगेल. असा इशारा यावेळी वडेट्टीवारांनी अजित पवारांना दिला.

Ajit pawar : शुक्रवारीच पदाचा राजीनामा दिला; बंडामागचं सत्य उघड करत अजितदादांचा गौप्यस्फोट!

आज सकाळपासूनच राज्यातील राजकारणात भुकंपसदृश्य स्थिती होती. NCP चे अनेक आमदार अजित पवारांसोबत सरकारमध्ये सामील होणार अशी चर्चा होती. परंतु, सरकारकडून याबाबत अधिकृत खुलासा आला नव्हता. अखेर आज दुपारी, अजित पवार हे ३० ते ४० आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. अजित पवार यांनी आज सकाळी त्यांच्या समर्थक आमदारांची देवगिरी बंगल्यावर बैठक घेतली. यानंतर संबंधित आमदारांच्या स्वाक्षरीचे पत्र घेऊन अजित पवार राजभवनात दाखल होते. त्यानंतर काही वेळातच अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक ज्येष्ठ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

अजित पवार यांच्या सोबत असलेले आमदार –
दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, किरण लहमाटे, निलेश लंके, धनंजय मुंडे, रामराजे निंबाळकर, दौलत दरोडा, मकरंद पाटील, अनुल बेणके, सुनिल टिंगरे, अमोल मिटकरी, अदिती तटकरे, शेखर निकम, निलय नाईक, अशोक पवार, अनिल पाटील, सरोज अहिरे हे आमदार अजित पवार यांच्या आजच्या बैठकीला उपस्थित होते.

 

follow us