Ajit pawar : शुक्रवारीच पदाचा राजीनामा दिला; बंडामागचं सत्य उघड करत अजितदादांचा गौप्यस्फोट!

Ajit pawar : शुक्रवारीच पदाचा राजीनामा दिला; बंडामागचं सत्य उघड करत अजितदादांचा गौप्यस्फोट!

Ajit Pawar News : आम्ही निर्णय घेऊन या सरकारमध्ये राष्ट्रवादी आणि आमदारांनी जाण्याचा निर्णय घेतला. शपथ घेतली. अजूनही काही विस्तार केला जाईल. त्यावेळीही आणखी काही जणांना सँधी देण्याचा प्रयत्न राहिल असे स्पष्ट करत शुक्रवारीच (28 जून) विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला असल्याचा गौप्यस्फोट अजित पवार (Ajit pawar) यांनी केला.

उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले. तसेच आपण हा निर्णय का घेतला याचीही सविस्तर माहिती दिली. पवार म्हणाले, सध्या जी काही परिस्थिती आहे याचा विचार करून विकासाला साथ देण्याचा निर्णय आम्ही घेतला. पंतप्रधान मोदी मजबुतीने देशाला पुढे नेण्याचे काम करत आहे. या पक्षाला साथ द्यायला हवी.

सध्या सगळे विरोधी पक्ष एक होत आहेत. बाकीचे राज्ये तुम्ही पहा. काँग्रेसविरोधात प्रादेशिक पक्ष जात आहेत. विरोधी पक्षाची बैठक होते पण निष्कर्ष काहीच निघत नाही. देशाला खंबीर नेतृत्वाची गरज आहे म्हणून हा निर्णय आम्ही घेतल्याचे पवार म्हणाले.

अजितदादांचा राष्ट्रवादी पक्षावर दावा; आगामी सर्व निवडणुका घड्याळ चिन्हावर लढवणार

ते पुढे म्हणाले, 24 वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. यानंतर पवार साहेबांच्या नेतृत्वात आम्ही पक्षवाढीसाठी काम केलं. आता पुढील काळात युवकांना संधी दिली जाणार आहे. मागील महाविकास आघाडी सरकारच्या काळात आम्ही करोनाचा विचार करून पुढे जाण्याचा निर्णय आम्ही घेतला होता.

राज्याचा विकास करणं हे आमच्या दृष्टीने जास्त महत्वाचे होते. आता मात्र या सरकारमध्ये आम्ही सामील झालो आहोत. राज्याचा विकास करायचा असेल तर निधीची जास्त गरज असते. आम्ही घेतलेला हा निर्णय पक्षातील आमदार आणि अन्य पदाधिकारी या सगळ्यांना माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणूनच आम्ही सरकारमध्ये सहभागी झालो आहोत. आगामी निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेसच्याच चिन्हावर लढणार असल्याचे सांगत पवार यांनी थेट पक्षावरच दावा ठोकला.

आम्ही शिवसेनेबरोबर जाऊ शकतो तर भाजप..

नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सात आमदार जिंकले. तेथे सर्व आमदार पक्षाची मंजुरी घेऊनच भाजपबरोबर गेले. साडेतीन वर्षांपूर्वी जो निर्णय आम्ही घेतला होता त्यावेळी महाराष्ट्रात तीन पक्षांचे सरकार होते. त्यावेळीही सरकारमध्ये सगळ्यांनी काम केलं. त्यात जातीयवादी म्हणण्याचा अधिकार जर आम्ही शिवसेनेबरोबर जाऊ शकतो तर आम्ही भाजपबरोबरही जाऊ शकतो.

राज्याच्या विकासासाठी दुर्बल घटकांसाठी न्याय देण्यासाठीचा अनुभव आम्हाला आहे. आज किंव उद्या खाती आम्हाला मिळतील. याबाबत राज्याचे मुख्यमंत्र्यांना सगळे अधिकार आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेऊ. आगामी काळात आम्ही आमच्या पक्षवाढीसाठी काम करणार असल्याचे पवार म्हणाले.

जे घडलं ते महाराष्ट्राच्या हिताचं, अजित पवारांच्या शपथ विधीवर फडणवीस म्हणाले…

follow us
  • fb
  • instagram
  • youtube