Download App

Vijay Wadettiwar : नाना पटोले यांनी राजीनामा दिला नसता तर सरकार टिकलं असतं

  • Written By: Last Updated:

नवी दिल्ली: “नाना पटोले (Nana Patole ) यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नसता तर सरकार टिकलं असतं” असा आहेरच विजय वडेट्टीवार यांनी नाना पटोले आणि काँग्रेसला दिला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार  (Vijay Wadettiwar) आज दिल्लीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांची भेट घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवर खर्गे यांच्याशी चर्चा केली.

खर्गे यांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, “मल्लिकार्जुन खर्गे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. तेव्हापासून आलो नव्हतो. त्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो. राज्यातील राजकारणावर सहज चर्चा झाली. माहिती त्यांच्या कानावर टाकली आहे.”

यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काल बोलताना नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचाराजीनामा दिला नसता तर सरकार पडलं नसत, असं मत व्यक्त केलं होत. त्यावर विजय वडेट्टीवार यांना विचारलं असता ते म्हणाले की, “नाना पटोले यांच्या रूपाने विधानसभा अध्यक्षपदी अनुभवी माणूस होता. त्यांनी सभागृह योग्य रित्या चालवलं होत. त्यांनी राजीनामा दिला नसता तर सभागृह त्यांनी योग्यरित्या चालवलं असत. राजीनामा दिल्यामुळे पुन्हा अध्यक्षपदाची निवडणूक झाली नाही. हि गोष्ट सरकारसाठी अडचणीची ठरली.”

मल्लिकार्जुन खर्गे यांच्या भेटीमध्ये राज्यातील प्रदेशाध्यक्ष बदलण्यावर चर्चा झाली का? या प्रश्नांवर प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा अधिकार हा हायकमांडचा आहे. ते माहिती घेऊनच निर्णय घेतील. असं ते म्हणाले.

follow us