Vijay Wadettiwar : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात विशाळगडावरील (Vishalgad) अतिक्रमण प्रकरणावरून राजकारण चांगलेच तापलं आहे. तर आता या प्रकरणात विधानसभा विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या या आरोपांमुळे पुन्हा एकदा या प्रकरणात आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे.
माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, रविवारी विशाळगडावर जमाव स्थानिकांचे नुकसान करत होते, तोडफोड करत होते मात्र पोलीस अधीक्षक गाडीत बसून केवळ पाहत होते असा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
तसेच पोलीस अधीक्षक यांना पदावर राहण्याचा कोणताही हक्क नाही, त्यांना तत्काळ निलंबन करा अशी मागणी देखील यावेळी विजय विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. पोलीस अधीक्षक गाडीत बसून पाहत होते. त्यामुळे विशाळगडावरील दंगल शासन पुरस्कृत होती का? असा सवालही यांनी यावेळी विचारला.
वडेट्टीवार पुढे म्हणाले, काही नालायक लोक विशाळगडावर हैदोस घालणार आहे याची माहिती गुप्तचर विभागाकडे होती त्यामुळे या प्रकरणात कारवाई करणे अपेक्षित होत, मात्र सरकारने बघ्याची भूमिका घेतली. जेव्हा नालायक लोक हैदोस घालत होते तेव्हा कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक गाडीत बसून फक्त पाहत होते. त्यामुळे विशाळगडावरील दंगल शासन पुरस्कृत होती काय? असा सवाल ही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
पोलिसांनी आतापर्यंत विशाळगडावरील अतिक्रमण प्रकरणात 400 हून अधिक अज्ञात कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहे आणि 21 जणांना अटक केली आहे.
विठ्ठला कृपा कर अन् राज्य दुष्काळमुक्त होवू दे, सुजय विखेंचे पांडुरंगाच्या चरणी साकडं
तर दुसरीकडे या प्रकरणातील रवींद्र पडवळ व त्याच्या साथीदारांना अटक करण्यासाठी पोलिसांची पथके देखील पुण्याला रवाना झाली असल्याची माहिती कोल्हापूर पोलिसांनी दिली आहे.
छगन भुजबळांशी काय चर्चा झाली, शरद पवारांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम