Download App

तलाठी भरतीचा खेळखंडोबा! तुम्ही पुरावे द्या, मी चौकशी करतो; फडणवीसांचं खुलं चॅलेंज

Devendra Fadnvis On Vijay Wadettivar : राज्यात मागील काही दिवसांपासून तलाठी पदभरती (Talathi Recruitment) परीक्षेत घोटाळा झाल्याचं समोर आलं होतं. या प्रकरणी पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. याच भरतीचा नूकताच निकाल जाहीर करण्यात आला असून एका उमेदवाराला परीक्षेत चक्क 200 गुणांपैकी 214 गुण मिळाल्याचा प्रकार घडला आहे. या मुद्द्यावरुन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettivar) यांनी तलाठीचा भरतीचा खेळखंडोबा झाल्याचा आरोप करीत एसआयटी चौकशीची मागणी केलीयं. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी आपली भूमिका मांडली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, तलाठी भरती प्रकरणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नूसतेचं वक्तव्य केली आहेत. त्यांनी वक्तव्य न करता पुरावा दिला तर चौकशी करणार असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी ठणकावून सांगितलं आहे. तसेच राज्यात तलाठी पदभरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीनेच पूर्ण झाली असून कोणत्याही परीक्षेचा पुरावा दिला तर आम्ही परीक्षाच रद्द करणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलं आहे.

नाशिक : महायुतीत हेमंत गोडसे फिक्स; ‘मविआ’मध्ये ठाकरेंची मोर्चेबांधणी अन् पवारांचीही चाचपणी

काय म्हणाले होते वडेट्टीवार?
“तलाठी भरती परीक्षा” हा एक मोठा घोटाळा आहे. या संपूर्ण घोटाळ्याची SIT चौकशी व्हावी ही आमची मागणी आहे. 200 पैकी 214 गुण एका उमेदवाराला मिळत असेल तर परीक्षा घेणारी संपूर्ण यंत्रणा किती गंभीरतेने काम करतय आणि सत्ताधाऱ्यांनी पदभरतीचा कसा खेळखंडोबा करून ठेवलंय हे आता स्पष्ट होत आहे” अशी पोस्ट वडेट्टीवारांनी एक्सवर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी भरतीत झालेल्या घोटाळ्याबाबतचा उल्लेख केल्याचं दिसून येत आहे.

शरद मोहोळ हत्याप्रकरण: मुख्य आरोपीसह आठ जणांना पोलिस कोठडी; पण वकिलांचा वेगळाच युक्तिवाद

मागील काही महिन्यांपूर्वीच राज्यात तलाठी भरती प्रक्रिया पार पडली. या भरती प्रक्रियेत अनेक उमेदवारांनी सावळा गोंधळ सुरु असल्याचा आरोप केल्याचं पाहायला मिळालं होतं. राज्यातील अनेक जिल्ह्यात तांत्रिक अडचणींमुळे परिक्षेत अडचणी आल्याचंही समोर आलं होतं. त्यावरुनही विरोधकांनी सरकारला चांगलच धारेवर धरल्याचं पाहायला मिळालं होतं.

दरम्यान, विजय वडेट्टीवार यांनी तलाठी भरती संदर्भात केलेल्या आरोपांनंतर देवेंद्र फडणवीसांनी आता पुरावा देण्याबाबतच खुलं चॅलेंजच दिलं आहे. फडणवीसांच्या या चॅलेंजनंतर आता वडेट्टीवार भरतीबाबतचे पुरावे सादर करणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.

follow us