Download App

विखे तुम्हा सगळ्यांना भारी पडतील; जयंत पाटलांचा BJPला इशारा, विखे खळखळून हसले

  • Written By: Last Updated:

मुंबई : राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) हे राज्याच्या राजकारणातलं एक मोठं नाव. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांना थेट भिडणारे विखे यांचा राजकारणासह सहकार क्षेत्रातही मोठा दबदबा आहे. मुरब्बी राजकारणाचा पिडं असलेल्या विखेंनी राजकारणात भल्याभल्यांना गार केलं आहे. दरम्यान, विखेंची मुरब्बी राजकारणी ही ओळख आज विधानसभेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी करून दिली. राधाकृष्ण विखे यांच्या संदर्भात पाटील यांनी भाजपला गर्भित इशारा दिला आहे. एक दिवस असा येईल की, हा माणूस तुम्हा सगळ्यांना भारी पडेल, असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं.

आज विधानसभेच्या सभागृहात कामकाज सुरु असतांना सत्ताधारी पक्षातील अनेक मंत्री हे गैरहजर होते. केवळ भाजप नेते आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे तेवढचे फक्त हजर होते. त्यावेळी जयंत पाटील प्रश्न विचारायला उभे राहिले. मात्र, अनेक मंत्रीच सभागृहात हजर नसल्यानं त्यांनी भाजपवर मिश्किल टिप्पणी केली. ते बोलतांना म्हणाले की, अध्यक्ष महोदय, आज सभागृहात एकच मंत्री उपस्थित आहेत. मग याचा अर्थ असा की, आम्ही फक्त महसुल, दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय याच खात्याच्या संदर्भात प्रश्न विचारायचे का? असा सवाल केला.

पाटील यांनी विखेंचं नाव न घेता मात्र, विखेंकडे पाहात म्हणाले की, सगळे भाजपचे मंत्री सभागृहात नाहीत. फक्त विखे तेवढे आहेत. हा माणूस खाली मुंडी पाताळ दुंडी आहे, कधी काय करलं नेम नाही… पाटलांच्या या वक्तव्यावर सभागृहात एकच हशा पिकला. खुद्द विखेंनाही हसू आवरलं नाही. जयंत पाटील म्हणाले, एक दिवस असा येईल की ते तुम्हालाही भार पडलीत, अशा शब्दात त्यांनी भाजपला सूचक इशारा दिला.

तेजस ठाकरे यांचे बॅनर! उद्धव यांचा दुसरा मुलगा राजकारणात उतरण्याची तयारीत?
खरंतर राधाकृष्ण विखे यांना लहानपणापासूनच समाजकारणाचं बाळकडू मिळालं आहे. मराठा समाजावर प्रभाव पाडेल, अशी त्यांच्या इमेज आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणावर त्यांची पक्की पकड आहे. त्याचं उपद्रवमुल्य जास्त आहे. वारं पाहून उपणणारे विखे कधी काय राजकीय खेळी करतील, याची नेम नाही. मुळचे कॉंग्रेसचे असलेले राधाकृष्ण विखे यांनी 2019 मध्ये कॉंग्रेस सोडून भाजपवासी झाले. सध्या त्यांच्याकडे मंत्रीपद आहे. त्यांचे सुपुत्र सुजय विखे हे देखील भाजपचे खासदार आहेत. विखेचं राजकारण पाहिलं तर विखे कॉंग्रेस, नंतर शिवसेना पुन्हा कॉंग्रेस आणि आता भाजपचे नेते आहेत. विखे हे महत्वकांक्षी नेते आहेत. त्यामुळं आता पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे विखे हे भाजपचे ताकतावान नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही जड जाऊ शकतात का, अशी राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली.

Tags

follow us