तेजस ठाकरे यांचे बॅनर! उद्धव यांचा दुसरा मुलगा राजकारणात उतरण्याची तयारीत?

तेजस ठाकरे यांचे बॅनर! उद्धव यांचा दुसरा मुलगा राजकारणात उतरण्याची तयारीत?

श्रीकृष्ण औटी (टीम लेट्सअप)

मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे दुसरे चिरंजीव तेजस ठाकरे हे राजकारणात कधी सक्रिय होतात याकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान आता त्यांच्या राजकारणातील एंट्रीबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. तेजस ठाकरे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राजकारणात प्रवेश करणार अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत. तर्कवितर्क असण्यामागे कारण म्हणजे गिरगाव येथे गुढीपाडव्याच्या यात्रेनिमित्तचे तेजस ठाकरे यांचे बॅनर लागले आहे व हे बॅनर आता राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेत आहेत.

दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत राहत बाळासाहेबांचा वारसा पुढे चालवत उद्धव ठाकरे यांनी राजकारणात प्रवेश केला. उद्धव ठाकरे व आजोबा बाळासाहेब ठाकरे यांच्या सहवासात राहून उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांनी देखील कमी वयातच राजकारणात प्रवेश केला. एकीकडे हे सगळे सुरु असताना उद्धव ठाकरे यांचे दुसरे चिरंजीव तेजस ठाकरे कधी राजकारणात प्रवेश करणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जेष्ठ पुत्र आदित्य हे राजकारणात सक्रिय आहेत. पण दुसरे पुत्र तेजस हे देखील वडिलांना संकटात साथ देण्यासाठी राजकीय शिवधनुष्य हातात घेण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे. मराठी भाषकांचा बालेकिल्ला असलेल्या गिरगाव भागात तेजस यांचे बॅनर लक्ष वेधून घेत आहेत.

शिवसेना राम मंदिराला विरोध करणाऱ्या काँग्रेस बरोबर गेली… तावडेंचा ठाकरेंवर निशाणा

गुढीपाडव्याच्या निमित्ताने या भागात आकर्षक मिरवणुका निघत असतात त्यांचे स्वागत करतानाचे हे सर्व फलक आहेत. उद्धव आदित्य आणि सोबत तेजस ठाकरे या तिघांचेही बॅनर लागले आहेत. प्राणीशास्त्रात गती असलेले म्हणून तेजस यांची ओळख आहे. शिवसेनेचे सचिव आणि उद्धव यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांनी गेल्या वर्षी तेजस यांच्या वाढदिवसानिमित्त सामना वृत्तपत्रात पहिल्या पानावर पूर्ण पान जाहिरात दिली होती.

अन् एकेदिवशी गुजरातला देशाची आर्थिक राजधानी घोषित केले जाईल…जयंत पाटलांनी व्यक्त केली भिती

त्यानंतरच तेजस हे राजकारणात उतरण्याची शक्यता वर्तवली जात होती. आता त्यांच्या समर्थकांनी गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपल्या नेत्याच्या स्वागताची तयारी चालवल्याची दिसून येत आहे. दरम्यान येत्या काळात मुंबई महापालिकेच्या निवडणुका आहेत. यातच शिवसेनेतील बंडानंतर आता उद्धव ठाकरे गटाला ही निवडणूक जड जाईल अशी शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. मात्र या आव्हानाच्या काळात आता उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र तेजस हे देखील वडिलांच्या मदतीसाठी राजकारणाच्या आखाड्यात उतरणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube