Vikram Rathod will Join Shivsena: महानगरपालिकेच्या निवडणुकीत अहिल्यानगरमधून उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. स्वर्गीय माजी आमदार अनिल राठोड यांचा मुलगा विक्रम राठोड (Vikram Rathod) यांनीही उद्धव ठाकरेंची साथ सोडलीय. विक्रम राठोड यांनी युवासेना सहसचिवपदाचा राजीनामा दिला आहे. ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत (Shivsena) प्रवेश करणार आहेत. विक्रम राठोड यांनी ठाकरेसेना सोडताना ठाकरेंवर जोरदार टीका केलीय.
विक्रम राठोड म्हणाले, आम्ही पक्षाशी एकनिष्ठ राहिलो आहे. वडिल पंचवीस वर्षे एकनिष्ठ होते. शिंदेसेना स्थापन झाली, तेव्हा सगळे गेले होते. पण आम्ही पक्षा शी एकनिष्ठ राहिलो आहे. आता निष्ठेची किंमत राहिलेली नाही. निष्ठेला व कार्यकर्त्यांची किंमत नाही. ज्या ठिकाणी कार्यकर्त्याची किंमत आहे ते एकनाथ शिंदे आहे. त्यांच्याबरोबर आम्ही जाणार आहे. कार्यकर्त्यांनी पक्षाशी निष्ठा ठेवली होती. पण पक्षाने कार्यकर्त्यांशी निष्ठा ठेवलेली नाही, अशी टीका त्यांनी ठाकरे यांच्यावर केलीय.
अहिल्यानगरमध्ये महायुती फिस्कटली ! शिंदेसेना स्वबळावर लढणार
इतर पक्षांकडून आलेल्या लोकांना महत्त्व दिले गेले. त्यांना पक्षाची माहिती नाही. दिशा चुकत चालली होती. अशा गोष्टीसोबत थांबू शकत नाही. आपण हिंदुत्वाच्या, आपण शिवाजी महाराजांच्या विचाराचो आहोत. ही गोष्ट कायम खटकत राहिली आहे. शिंदेबरोबर आलो नाहीतर कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकत नाही. स्वतःला न्याय देऊ शकत नाही, असे ते म्हणाले.
ब्रेकिंग : BMC साठी काँग्रेसचे तगडे 87 उमेदवार जाहीर; ठाकरेंच्या बालेकिल्ल्यातील नावामुळे फाईट ‘टफ’
पक्ष देईल ती जबाबदारी घेणार-विक्रम राठोड
महानगरपालिकेच्या उमेदवारीबाबत सचिन जाधव, अनिल शिंदे, संभाजी कदम चर्चा करून निर्णय घेणार आहे. कोणतीही जबाबदारी दिली आहे. पक्षाने कोणतीही जबाबदारी दिली तरी ती जबाबदारी उचलणार असल्याचे विक्रम राठोड यांनी म्हटलंय.
