Download App

शरद पवार ईडीच्या नोटीसला घाबरले नाही, ते तुझ्या नोटीसला काय घाबरणार ? सुप्रिया सुळेंनी घेतला टिंगरेंचा समाचार

  • Written By: Last Updated:

Supriya Sule : राज्यात विधानसभा निवडणुकीच (Vidhansabha Election) रणधुमाळी सुरू झाली. सत्ताधारी आणि विरोधक सातत्याने एकमेकांवर टीका-टिप्पणी करत आहे. आता खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) अजित पवार गटाचे उमेदवार सुनील टिंगरे (Sunil Tingre) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. इथल्या स्थानिक नेत्याने पोलिस स्टेशनला जाऊन पोर्श कार प्रकरणातील आरोपींना पिझ्झा आणि बिर्याणी खायला दिली, आणि शरद पवार बोलले तर कोर्टात खेचू अशी नोटीस बजावली, अरे शरद पवार (Sharad Pawar) ईडीच्या नोटीसला घाबरले नाही, ते तुझ्या नोटीसला काय घाबरणार, असा हल्लाबोल सुळेंनी केला.

India VS South Africa: संजू सॅमसनने थेट इतिहास रचला ! टी-20 क्रिकेटमध्ये दोन जबरदस्त शतके 

बापूसाहेब पठारेंच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीची आज वडगाव शेरीला सभा झाली. यावेळी सुप्रिया सुळेंनी पोर्श कार प्रकरणावरून आमदार टिंगरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. 2019 मध्ये ज्यांच्या एबी फॉर्मवर शरद पवारांची सही आहे, शरद पवारांच्या सहीमुळे ज्यांना तिकीट मिळालं, त्यांनी काय केलं हे तुम्हाला ठाऊकच आहे. ज्याने दोन युवक-युवतींना कार अपघातात उडवलं, त्याला इथल्या आधीचे आमदाराने मदत केली. पोलिस स्टेशनला जाऊन पोर्श कार प्रकरणातील आरोपींना पिझ्झा आणि बिर्याणी खायला दिली. रक्त बदलण्याचे काम त्यांनी केलं. मात्र, आम्ही त्या दोन निष्पाण युवक-युवतीच्या परिवाराला न्याय मिळवून दिल्याशिवाय गप्प राहणार नाही, असं सुळे म्हणाल्या.

विकासकामांबद्दल समाधान, नागरिकांचा निर्णय ठरलेला, संग्राम जगतापांना कॉन्फिडन्स 

पोर्श कार प्रकरणावर शरद पवार बोलले, तर शरद पवारांनाही नोटीस पाठवली. पोर्श कार प्रकरणावरून माझी बदनामी कराल तर कोर्टात खेचू अशी नोटीस बजावली. अरे शरद पवार दिल्लीच्या ईडीच्या नोटीसला घाबरले नाही, तुझ्या नोटीसला काय घाबरणार, असा हल्लाबोल सुळेंनी केला.

मी शंभरवेळा नोटीस पाठवणाऱ्याला आव्हान करतो, तुम्ही ठरवा, ती जागा आणि त्या ठिकाणावर येऊन मी पोर्श कार प्रकरणावर बोलते. पण, निष्पाण मुला-मुलीच्या कुटुंबाला न्याय मिळूनन देईल. हिंमत असेल तर सुप्रिया सुळे, रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारेंना नोटीस पाठव, असं आवाहनही सुळेंनी दिलं.

सॅम्पल बदण्याचे पाप केलं
आम्ही ना बिर्यानी घेतली, ना रक्ताचे सॅम्पल बदलले. ते पाप तुमच्या सरकारने केलं. तुम्ही कितीही नोटीसा पाठवा, आम्ही सत्याच्या बाजूनेच उभं राहणार. सत्य परेशान हो सकता है, मगर पराजित नही, असंही सुळे म्हणाल्या.

दरम्यान, यावेळी त्यांनी बापूसाहेब पठारेंनी निवडून द्या, असं आवाहनही सुळेंनी केलं. आता आपल्याला तुतारी वाजवायची. त्यासाठी बापूसाहेब पठारेंच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा, असंही सुळे म्हणाल्या.

follow us