विकासकामांबद्दल समाधान, नागरिकांचा निर्णय ठरलेला, संग्राम जगतापांना कॉन्फिडन्स
Sangram Jagtap : अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे (Mahayuti) उमेदवार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांची नगर विकास यात्रा चारमध्ये आज पोहोचली. यावेळी संग्राम जगताप यांनी गेल्या दहा वर्षात झालेल्या आणि सध्या मतदारसंघात सुरु असलेल्या कामांबद्दल नागरिकांना माहिती दिली.
तसेच यावेळी माध्यमांशी बोलताना महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप म्हणाले की, नागरिकांशी संवाद साधणे, मतदारसंघात चालू असलेल्या विकास कामांची त्यांना माहिती देणे एवढ्याचसाठी ही विकासयात्रा आहे. तिला चांगला प्रतिसाद मिळतो, असा रोजचा अनुभव आहे.
पारिजात चौक आणि परिसरातील नागरिक मतदारसंघातील विकासकामांबद्दल समाधानी असल्याचे दिसत आहे. असं माध्यमांशी बोलताना संग्राम जगताप म्हणाले. महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप यांची आज पारिजात चौकापासून विकासयात्रेला सुरुवात होती. या यात्रेमध्ये नरहरीनगर, फडके मळा, आसरा कॉलनी, नंदनवननगर, जयश्री कॉलनी, नीलगिरी पार्क, जिजाऊ उद्यान परिसर, कल्पतरू सोसायटी, ममता गॅस गोडाऊन परिसर, नवलेनगर, सावली सोसायटीमधील नागरिकांशी जगताप यांनी भेट घेतली.
यावेळी गवेगळ्या कॉलनी, वस्त्या, सोसायटी येथे रहिवाशांनी अतिशय आपुलकीने त्यांचे स्वागत केले. तर महिलांनी निवडणुकीतील यशासाठी शुभेच्छा देताना कुंकुमतिलक लावून औक्षण केले. तसेच नगर शहर, उपनगरे येथे काँक्रीटचे रस्ते, चौकांचे सुशोभिकरण, महापुरुषांची प्रेरणादायी स्मारके अशी कामे झाली आणि होत आहेत.
पाणी, ड्रेनेज आदी मूलभूत सोयी पूर्ण करण्याकडे कटाक्षाने लक्ष देत आहे. मतदारसंघाचा चेहरा बदलणारी ही विकासकामे भविष्यातही अशाच जोमाने चालू राहावीत, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. त्यासाठी त्यांचा निर्णय ठरलेला आहे, हे त्यांच्याशी संवाद साधताना जाणवले. अशी माहिती देखील माध्यमांशी बोलताना महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप यांनी दिली.
बाळासाहेबांच्या शिवसेनेचे खरे वारसदार हे उद्धव ठाकरेच, मीच वारस पत्र बनविले; अनिल परबांचा दावा
राज्यात महाराष्ट्रा विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election) एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदार प्रक्रिया पार पडणार असून 23 नोव्हेंबर रोजी मत मोजणी होणार आहे. राज्यात यावेळी मुख्य लढत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये होताना दिसत आहे.