बाळासाहेबांच्या शिवसेनेचे खरे वारसदार हे उद्धव ठाकरेच, मीच वारस पत्र बनविले; अनिल परबांचा दावा

  • Written By: Published:
बाळासाहेबांच्या शिवसेनेचे खरे वारसदार हे उद्धव ठाकरेच, मीच वारस पत्र बनविले; अनिल परबांचा दावा

प्रतिनिधी : प्रशांत गोडसे

Anil Parab : महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळ्यानंतर राजकीय भूकंप झाला होता. 2022 साली शिवसेना पक्षात मोठी फूट पडली. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) शिवसेनेला (Shiv Sena) मिळाले आहे. मात्र खरी शिवसेना कोणाची यावरून सध्या कोर्टात वाद आहे सुरू आहे. यावरूनच मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शिवसेना ही ना उद्धव ठाकरेंची प्रॉपर्टी आहे.. ना एकनाथ शिंदेंची प्रॉपर्टी आहे.. शिवसेना ही खरी बाळासाहेबांचे प्रॉपर्टी असल्याचं म्हटलं होतं.

यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत असताना, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे खरे वारसदार हे ना एकनाथ शिंदे,ना राज ठाकरे खरे वारसदार हे उद्धव ठाकरेच. कारण मी याचा साक्षीदार असून वकील या नात्याने त्यांचे वारस पत्र बनवले असल्याची माहिती ठाकरे शिवसेना आमदार नेते अनिल परब यांनी दिली आहे. ते मुंबई मराठी पत्रकार संघ आयोजित ‘विधानसभा निवडणूक विशेष वार्तालाप मालिका’ उत्सव लोकशाहीचा 2024 या मालिकेच्या पहिल्या भागात अनिल परब बोलत होते.  यावेळी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, उपाध्यक्ष राजेंद्र हुंजे उपस्थिती होते.

आघाडी कशी झाली?

अनिल परब म्हणाले की, पहिली गोष्ट म्हणजे शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी ही एक कॉमन मिनीमन प्रोग्राममुळें आघाडी झाली होती. आज जी शिवसेना लढते आहे ती पंचसूत्रीवर चालत आहे. प्रत्येक पक्षाचे धोरण आहे त्यापासून आम्ही मागे गेलो नाही. तसेच आमच्या घरात आज चोरी झाली. घर सावरायला थोड वेळ द्याल की नाही. तोच आम्ही करतोय हळूहळू आम्ही घर सावरू लागलो आहे.

पंतप्रधान, सरन्यायाधीश हिच महाशक्ती..

जेव्हा आमचा पक्ष फोडला तेव्हा ते म्हणाले होते की, आमच्यामागे महाशक्ती आहे. महाशक्ती कोण आहे तर पंतप्रधान, सरन्यायाधीश ही यांची महाशक्ती आहे. निकाल लांबवला गेला आहे. मोदी कोण आहेत नक्की हे तुम्हाला कळत असेल. केवळ विधानसभेच्या संख्याबळावर तुम्हाला निर्णय घेता येत नाही, असं झालं आहे हे दुर्दैवी आहे.

ते ऐकून चक्कर येत आहे..

राजकीय पक्षांची पूर्वी खिचडी होती, आता मसाला खिचडी झाली आहे. आता वेगवेगळे पक्ष या बंडखोराना मसाला म्हणून वापरत आहेत. काही पक्ष हे बंडखोऱ्याना पोसायचे काम करत आहेत. भाजपने एक राज्यात बंडखोर उभे करून त्याना पोषण्याचे काम केलं आहे.

हरियाणात जे काही घडले ते महाराष्ट्रात करण्याचा प्रयत्न होतोय. प्रचंड पैसे वाटले जात आहेत. पैसे पोलिसांच्या गाडीतून जात आहेत. काही पोलीस आमचे नातेवाईक आहेत. ते आम्हाला सांगतात पोलिसांच्या गाडीत पैसे दिले जात आहेत. पोलीस सुरक्षेत पैसे दिले जात आहेत. आम्हाला हे ऐकून चक्कर येत आहे. राजकरणात अशा प्रकारे पैसाचा वापर झाला तर कार्यकर्ता घडवून त्याला निवडणूक लढवता येईल असे वाटत नाही. असं परब म्हणाले.

‘राजकारण संपले असे वाटले पण…’, गोपीनाथ मुंडेंच्या आठवणीने कर्डिले भावूक

बाळासाहेबांचे हक्कदार उद्धवसाहेब

बाळासाहेब यांचे व्हील मी बनवले आहे. राज ठाकरे यांनाही माहीत नाही ते मला माहीत आहे. पण बाळासाहेब ठाकरे यांनी कमावलेली प्रॉपर्टी आहे. ती शिवसेना आणि बाळासाहेबांची सगळी प्रॉपर्टी उद्धव ठाकरे यांना दिले आहे. शिवसेना आणि चिन्ह ही सगळी बाळासाहेबांची प्रॉपर्टी आहे. ती ना राज साहेबांची आहे.,ना चोरणाऱ्यांची आहे. ती केवळ उद्धव ठाकरे यांचीच असल्याचं अनिल परब म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube