राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान; मतदानासाठी सुट्टी न दिल्यास कारवाईचा इशारा

मतदानाच्या दिवशी कर्मचाऱ्यांना सुटी किंवा आवश्यक सवलत न दिल्यास संबंधित आस्थापनांवर दुकाने व आस्थापना खात्यामार्फत कठोर कारवाई करण्यात येईल.

Untitled Design (247)

Untitled Design (247)

Warning of action if leave is not granted for voting : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार असून, या दिवशी बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबतचे अध्यादेश महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग तसेच उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने निर्गमित केले आहेत. हा निर्णय प्रभावीपणे अंमलात आणण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मुंबई शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे यांसाठी स्वतंत्र दक्षता पथके स्थापन केली आहेत. मतदानाच्या दिवशी कर्मचाऱ्यांना सुट्टी किंवा आवश्यक सवलत न दिल्यास संबंधित आस्थापनांवर दुकाने व आस्थापना खात्यामार्फत कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे.

कोणत्या आस्थापनांना सुट्टी लागू?

पालिका क्षेत्रातील केंद्र व राज्य शासनाची शासकीय व निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका यांना ही सार्वजनिक सुटी लागू राहणार आहे. तसेच, पालिका निवडणूक क्षेत्रातील मतदार शहराबाहेर कार्यरत असले तरी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी मिळणार, असे अध्यादेशात स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने जारी केलेल्या स्वतंत्र आदेशानुसार सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने, खासगी कंपन्या, निवासी हॉटेल्स, खाद्यगृहे, नाट्यगृहे, व्यापार व औद्योगिक उपक्रम, आयटी कंपन्या, शॉपिंग सेंटर्स, मॉल्स आणि रिटेलर्स यांनाही मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी देणे बंधनकारक असणार आहे.

एमआयएमशिवाय नगरचा महापौर होणार नाही, असदुद्दीन ओवैसींचा थेट दावा

तक्रारींसाठी संपर्क क्रमांक

मतदानाच्या दिवशी सुट्टी किंवा सवलत न दिल्यास नागरिकांनी तक्रार नोंदवावी, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. यासाठी मुंबई शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे यांसाठी विशेष दक्षता पथके नियुक्त करण्यात आली आहेत. तक्रारींसाठी दूरध्वनी क्रमांक : 9122-31533187 वर संपर्क साधता येणार आहे.

Exit mobile version