Download App

धनुभाऊ तुम्हाला महाराष्ट्रात फिरायचय…सकल मराठा समाजाचा कृषीमंत्री मुंडेंना थेट इशारा

अनेक ठिकाणी मराठा आरक्षणातील लढ्यात सहभागी झाल्याने अनेक कार्यकर्त्यांना त्रास होतो. आता यातील अनेकांनी थेट मंत्री मुंडेंना इशारा दिला आहे.

Dhananjay Munde : राज्यात पुन्हा एकदा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संघर्ष सुरु झाला आहे. (Maratha) ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांना चॅलेंज दिलं. यावरून आता नगरमधील सकल मराठा समाजाने ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यासह मंत्री धनंजय मुंडे यांना इशारा दिला आहे. आमच्या वाहनांची अडवणूक केली जात आहे. (Dhananjay Munde) हा विषय तुमच्या बीड जिल्ह्यापुरता आहे. मात्र, तुम्हाला महाराष्ट्रात फिरायचं हे लक्षात राहूद्या. आम्हाला त्रास देणार असाल तर भविष्यात तुमच्या गाड्या आम्ही फोडल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला उग्र रूप धारण करायला लावू नका. (Maratha Reservation) अन्यथा येणाऱ्या काळात तुमची वाहनं देखील महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला.

नगरमध्ये बैठक झाली अखेर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते दानवेंचं निलंबन मागे, शिवीगाळ प्रकरणात झाली होती कारवाई

राज्यात पुन्हा एकदा ओबीसी विरुद्ध मराठा संघर्षाची ठिणगी पडली असल्याने आता दोन्ही समाजातील नेत्यांसह कार्यकर्ते आता आक्रमक झाले आहे. यातच सकल मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील यांच्यावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी शाब्दिक टीका करण्यास सुरुवात केली. यामुळे दोन्ही समाजतील तेढ दिवसेंदिवस वाढू लागला आहे. सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणीसाठी मराठा समाज आक्रमक आहे, तर दुसरीकडं ओबीसींमधून मराठा समाजाला आरक्षण देण्यात येऊ नये यासाठी ओबीसी नेते आक्रमक आहेत. यामुळे हा संघर्ष पेटू लागला आहे. यामुळे पुन्हा एकदा सकल मराठा समाज आंदोलनाच्या भूमिकेत आहे. यातच नगर मध्ये सकल मराठा समाजाची एक बैठक पार पडली. यावेळी त्यांनी ओबीसी नेत्यांना इशारा दिला आहे.

वडापाव खाऊन उपोषण.

मनोज जरांगे यांच्यावर टीका करणारे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना सकल मराठा समाजाने इशारा दिला आहे. सरकारने हे असे प्यादे जे उभे केले आहे ते त्यांनी उभे करू नये. वडापाव खाऊन उपोषण करणारे हाके यांनी स्वतःच्या जातीचं पाहावं मराठा समाजाच्या विरोधात उभे राहण्याचं काम करू नये. सरकारला विनंती आहे की लवकरात लवकर सगेसोयरे कायद्याची अमंलबजावणी करावी. अन्यथा येणाऱ्या काळात जरांगे पाटील यांच्या सूचनेनुसार आम्ही विधानसभेच्या सर्वच्या सर्व जागा लढणार आहोत असा इशारा यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.

धनंजय मुंडेंना इशारा धनंजय मुंडेंच्या हातात काहीच नाही; परळीत दहशद वाल्मिक कराडांची, रोहित पवारांचा घणाघात

यावेळी मराठा बांधवांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर देखील टीका केली. धनु भाऊ तुम्हाला शेवटची विनंती आहे की आमच्या वाहनांवर शिवाजी महाराजांचे चित्र आहे की जरांगे पाटील यांचे हे पाहून गाड्या तपासल्या जात आहेत. हा विषय फक्त बीड पुरता आहे. मात्र, तुम्हाला महाराष्ट्रात फिरायचं आहे. आम्ही आजही गोपीनाथ मुंडे यांना दैवत मानतो मात्र नाईलाजाने भविष्यात कधी एखाद्या वाहनावर मुंडे यांचा फोटो असेल भगवान बाबा यांचा फोटो असेल या गाड्या आम्ही फोडल्या तर तुम्हाला देखील त्रास होईल. मात्र, आमची शिकवण तशी नाही म्हणून आम्हाला उग्र रूप धारण करायला लावू नका. अन्यथा येणाऱ्या काळात तुमची वाहने महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला.

follow us