Download App

धंगेकरांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंनी सांगितला जॉर्ज फर्नांडिस यांचा किस्सा; वाचा..

Uddhav Thackeray : कसबा पोटनिवडणुकीत विजय मिळविल्यानंतर आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ठाकरे म्हणाले, की आपण जर एकत्र आलो तर जिंकू शकतो. कसब्याच्या निकालाने (kasba Byopoll) हे दाखवून दिले आहे.

वाचा : Uddhav Thackeray : पक्ष, चिन्ह गेल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदा विधिमंडळात 

धंगेकर यांचे कौतुक करताना ठाकरे यांनी एक जुना किस्साही सांगितला. त्या काळात काँग्रेस जोमात होती. स. का. पाटील यांच्यासारख्या मातब्बर उमेदवाराच्या विरोधात जॉर्ज फर्नांडिस उभे राहिले. जॉर्ज माझ्या वडिलांचे चांगले मित्र होते.जॉर्ज नवखे होते. त्यामुळे हा नवखा काय करणार, असे सगळ्यांना वाटले. मात्र चमत्कार घडला आणि या निवडणुकीत जॉर्ज जिंकले. त्याच विजयाची आठवण आज कसबा निवडणुकीने करून दिली आहे.

Ramdas Kadam : उद्धव ठाकरे यांना व्याजासकट उत्तर देणार, शिवसेना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही

कसबा हा गेल्या तीस वर्षांपासून भाजपचा बालकिल्ला होता. मात्र हा बालेकिल्ला सपाट करून आपण जिंकू शकतो हा विश्वास धंगेकरांनी देशाला दिला. आगामी काळातील निवडणुकाही महाविकास आघाडी म्हणून एकत्रच लढू, असेही त्यांनी सांगितले.

राजकारणातील कटुतेवर फडणवीस यांनी भाष्य केले होते. त्यावर ठाकरे म्हणाले, की त्यांच्यासोबत जे गेले नाहीत त्यांच्यावर कारवाई होते, ते काय आहे ? सध्या जी कारवाई चालली आहे ती सूड भावनेने नाही का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. रोज उठून ठाकरेंविरोधात शिमगा करता पण त्यातून काहीच होत नाही. आता लवकरच या खोकेवाल्यांची होळी होणार आहे, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

Tags

follow us