Download App

मराठवाड्यात गोपीनाथ मुंडेंच्या गडाला सुरुंग! पंकजा मुंडेंचा पराभव, काय आहेत कारणं?

बीड जिल्ह्यात मोठी संघर्षाची निवडणूक झाली. येथे ओबीसी विरूद्ध मराठा असा थेट संघर्ष येथे झाला. त्यामध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाला.

Image Credit: Letsupp

Beed Lok Sabha Election Results 2024 : बीड लोकसभेची निवडणूक जाहीर झाली अन् एका नव्या संघर्षाची सुरूवात झाली. हा संघर्ष इतका टोकाचा होता की या निवडणुकीचा निकाल हा श्वास रोखायला लावणार होता. मोठी अटीतटीची लढाई झाली. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदावर बजरंग सोनवणे याचा विजय झाला. तर, माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा निसटता पराभव झाला. दरम्यान, आता या लढतीचे वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत. तसंच, पंकजा मुंडे यांचा पराभव कसा झाला आणि या पराभवाची कारणं काय? त्याचबरोबर मराठा आरक्षण विषयाचा किती फटका बसला याचाही मुद्दा उपस्थित होत आहे.

पराभवाची मोठी कारण

विधानसभेनंतर पंकजा मुंडे यांचा सलग दुसरा पराभव आहे. 2019 साली विधानभेलाही त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर त्यांना अनेक ठिकाणी संधी मिळेल अशी चर्चा होती. मात्र, त्याची चर्चाच राहिली. अखेर विद्यमान खासदार प्रितम मुंडे यांची उमेदवारी कापून पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, पंकजा यांचा अवघ्या 6000 मतांनी पराभव झाला. त्यानंतर त्यांच्या पराभवाला प्रमुख कारणं ठरलं ते मराठा आरक्षणाच्या संदर्भात भाजपने म्हणजे सत्ताधारी पक्षांनी घेतलेली भूमिका. ही भूमिका पंकजा यांना किंवा अनेक मराठवाड्यातील भाजप नेत्यांना लोकापर्यंत सकारात्मकपणे घेऊन जाता आलं नाही त्यामुळे विरोधात वातावरण निर्माण झालं अशी मोठी चर्चा आहे. आणि त्याचा मोठा परिणाम पंकजा मुंडे यांच्या विरोधामध्ये वातावरण निर्मिती करण्यात आला. तर, दुसरीकडे महाविकास आघाडीच्या बाबतीत लोकांमध्ये सकारात्मक वातावरण पाहायला मिळाल.

समाजाचा मोठा विरोध

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न उपस्थित केल्यानंतर या आरक्षणाच्या प्रश्नाचा सर्वाधिक परिणाम हा बीड आणि परिसरात होत होता. मात्र, मनोज जरांगे यांनी उभा केलेल्या या मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मराठा विरुद्ध ओबीसी असं वातावरण निर्मिती झाली होती. यात ओबीसी पंकजा मुंडे यांच्या बाजूने झाले तर मराठा स्पष्टपणे पंकजा मुंडे यांच्या विरोधात उभा राहिला. आणि हे चित्र स्पष्टपणे जाणवलं. यामध्ये बीड जिल्हा हा बहुतांश मराठा मतांचा टक्का असलेला जिल्हा आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये मराठा मतदान विरोधात गेल्यामुळे पंकजा मुंडे यांचा पराभव झाला असंही यामध्ये समोर येत आहे.

सोनवणे यांच्या विजयाचं वैशिष्ट्ये काय?

अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये फूट पडल्यानंतर बजरंग सोनवणे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणं पसंत केलं. यामुळे बीड जिल्ह्यामध्ये शरद पवार यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे, तो आपल्या बाजूने करण्यात बजरंग सोनवणे यांनी यश मिळवलं. त्याचाच परिणामही झाला. त्याचमुळे तब्बल साडेसहा लाखापेक्षा जास्त मतं घेऊन बजरंग सोनवणे हे खासदार झाल. मात्र बजरंग सोनवणे यांच्या या खासदारकीच्या प्रवासामध्ये सर्वाधिक मोठा वाटा राहिला तो म्हणजे मनोज जरांगे पाटील यांचा. मनोज जरांगे पाटील यांनी उभा केलेल्या मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरचा लढा उभा राहिला तो बीड परिसरामध्ये. त्याचा मोठा परिणाम या निवडणुकीत दिसून आला.

अनेक ठिकाणी दबाव

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडल्यानंतर बजरंग सोनवणे हे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट पडल्यानंतर बजरंग सोनवणे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झाले. त्यांच्यासोबत बीड विधानसभे मतदारसंघातील आमदार संदीप क्षीरसागर हे सोबत राहिले. या व्यतिरिक्त कोणही बडा नेता नसताना बजरंग सोनवणे यांनी पूर्ण जिल्हा पालथा घातला आणि यापूर्वीच्या राजकीय अनुभवाचा फायदा घेत तीन ते चार आठवड्याच्या मेहनतीवर सोनवणे यांनी मोठी ताकद निर्माण केली. मात्र, या निवडणुकीत सर्वात महत्वाचा भाग होता तो सामान्य मतदारांनी घेतलेली भूमिका. मतदारांनी या निवडणुकीत कोणत्याही नेत्याचं ऐकलं नाही. अनेक ठिकाणी दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, लोकांनी त्याला काही महत्व दिलं नाही.

 

कोणत्या विधानसभा मतदारसंघातील काय स्थिती?

परळी विधानसभा मतदारसंघ

गेवराई विधानसभा मतदारसंघ

माजलगाव विधानसभा मतदारसंघ

बीड विधानसभा मतदारसंघ

आष्टी विधानसभा मतदारसंघ

केज विधानसभा मतदारसंघ

follow us

वेब स्टोरीज