Download App

लई अवघड हाय गड्या उमगाया “बाप्पा “रं… मिटकरींची पोस्ट चर्चेत, वाल्मिक कराड अन् बजरंग सोनवणे एकत्र?

Amol Mitkari Social Media Post On Walmik Karad : राज्यातील बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांना 14 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्यात आलंय. कराडला बीड शहर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले असून, त्यांच्या कथित राजकीय प्रभावामुळे बंदोबस्त कडक करण्यात आला आहे. मात्र, कोरेगावचे सरपंच आणि धनंजय मुंडे यांचे समर्थक बालाजी तांदळे यांनी सीआयडी अधिकाऱ्यांसह पोलिस ठाणे गाठल्याने वादाला तोंड फुटले. दरम्यान आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी देखील एक सोशल मिडिया पोस्ट करत सर्वांचं लक्ष वेधलंय.

संतोष देशमुख हत्या प्रकरण : फरार दोघा आरोपींना बेड्या; पुण्यात केली अटक

अमोल मिटकरी यांनी X अकाउंटवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, लई अवघड हाय गड्या उमगाया “बाप्पा “रं. या फोटोमध्ये वाल्मिक कराड (Walmik Karad) अन् विद्यमान खासदार बजरंग सोनवणे दिसत आहेत. मिटकरींनी त्यांच्या अधिकृत अकाउंटवर ही पोस्ट केलीय. त्यांनी कॅप्शममध्ये समजण्यास खूप अवघड आहे, असं देखील म्हटलंय. खासदार बजरंग सोनवणे (Bajrang Sonwane) यांनी देखील वाल्मिक कराडवर गंभीर आरोप केलेले आहेत.

खासदार बजरंग सोनवणे हे काल संतोष देशमुख हत्याप्रकरणी दिल्ली दरबारी पोहचले (Beed News) होते. या प्रकरणात दोन पोलीस अधिकाऱ्यांची तक्रार राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे त्यांनी केलीय. कराड हा धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय मानला जातोय. तर वाल्मिक कराड आत्मसमर्पण करण्यासाठी ज्या गाडीतून पोहोचला होता, ती अजित पवार यांच्या ताफ्यातील होती असा आरोप देखील बजरंग सोनवणे यांनी केला होतो. तीच गाडी काही दिवसांपूर्वी अजित पवारांच्या ताफ्यात होती, असं म्हणत बजरंग सोनवणे यांनी वाल्मीक कराड आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या लागेबांधे असल्याचं सूचक वक्तव्य केलं होतं.

रोहितच्या करिअरला ब्रेक लावणारे 188 दिवस; सहा महिन्यांत नेमकं काय घडलं?

त्यानंतर आता अमोल मिटकरींनी वाल्मिक कराड, कैलास फड अन् खासदार बजरंग सोनवणे एकत्र बसले असल्याचा फोटो ट्विट करत, पुन्हा सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. वाल्मिक कराड अन् बजरंग सोनवणे यांचे देखील लागेबंध आहेत, असं मिटकरी या पोस्टमधून सुचवू पाहात आहेत. या फोटोत कैलास फड देखील आहे. फडचा काही दिवसांपू्र्वी हवेत गोळीबार करत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. मिटकरींच्या या ट्विटमुळं आता पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

 

follow us