Download App

Assembly By Poll: विरोधकांनी परंपरा जपावी; मुख्यमंत्र्यांचे आवाहान

  • Written By: Last Updated:

मुंबईः पुण्यातील चिंचवड (Chinchwad), कसबा (Kasbha) विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक (Maharashtra Assembly BY Election जाहीर झाली आहे. या दोन्ही जागेवर भाजपचे आमदार राहिलेले आहेत. परंतु त्या ठिकाणी निवडणूक लढण्याबाबत महाविकास आघाडी इच्छुक आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही इच्छुकांना पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. त्यामुळे या जागा बिनविरोध होणार नसल्याचे बोलले जात आहे. भाजप, शिंदे गटाकडून ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी मागणी होत आहे. त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, पिंपरी, कसबा येथील दोन्ही जागा बिनविरोध झाल्या पाहिजे. एखाद्या जागेवरील आमदाराचे निधन झाल्यानंतर त्या जागेवर दुसरे पक्ष उमेदवार देत नाहीत. ही परंपरा आहे. महाराष्ट्रातील परंपरा विरोधकांनी जपली पाहिजे, असे आवाहन शिंदे यांनी विरोधी पक्षांना केली आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत ही परंपरा, भाजप व आम्ही जपली असल्याचे शिंदे म्हणाले.

लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे चिंचवड, तर मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे कसबा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. दोन्ही ठिकाणी त्यांच्या घरातील उमेदवार भाजपकडून दिला जाईल, असे बोलले जात आहे. परंतु अद्याप भाजपने आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत.

तर दोन्ही ठिकाणी महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी, शिवसेना हे पक्ष या ठिकाणी निवडणूक लढण्यास इच्छूक आहे. त्या ठिकाणी दोन्ही पक्षाकडून चाचपणी सुरू आहे. या पक्षामधील काही जणांना पक्षाकडून उमेदवारी मागितले आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनेक जण इच्छूक आहे. त्यात आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ही जागा ठाकरे गटाकडे मागितली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये या दोन्ही जागा लढण्याची तयारी दिसून येत आहे.

Tags

follow us