Prakash Ambedkar : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha elections) सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी नवीन निवडणूक चिन्हांची यादी निवडणूक आयोगाला सादर केली आहे. आंबेडकर यांनी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Rajeev Kumar) यांची दिल्लीत भेट घेतली. त्यावेळी त्यांनी ही यादी सादर केली. त्यामुळं आता वंचितला एक ते दोन दिवसांत नवे निवडणूक चिन्ह मिळणार आहे.
Loksabha Election : शरद पवारांचं सरप्राईज; माढ्याची जागा महादेव जानकरांनाच…
निवडणूक आयोगाकडे या चिन्हांची मागणी
वंचित आघाडीला उमेदवार उभे करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून निवडणूक चिन्ह घ्यावे लागणार होते. त्यासाठी आंबेडकर हे दिल्लीत गेले आहेत. आंबेडकर यांनी आज मुख्य निवडणूकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाकडे नवीन निवडणूक चिन्ह मिळावे अशी मागणी केली. प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक आयोगाला गॅस सिलिंडर, शिट्टी आणि रोडरोलर ही निवड चिन्हे आयोगाकडे सुपूर्द केली. निवडणूक आयोग एक ते दोन दिवसांत या चिन्हाबाबत निर्णय घेईल, अशी अपेक्षा आहे.
दरम्यान, यावेळी माध्यमांशी बोलतांना त्यांनी भाजप सरकारवर टीका केलीय.दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने केलेली अटक बेकायदेशीर आहे, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने अबकारी धोरण ठरवले होते. हा त्यांच्या मंत्रिमंडळाचा निर्णय होता.
मंत्रिमंडळाच्या निर्णयांना न्यायालय किंवा तपास यंत्रणा आव्हान देऊ शकत नाहीत, परंतु मोदी आणि शहा सरकार संविधानाबाहेर काम करत असल्याची टीका त्यांनी केली.
जागावाटपाचा तिढा सुटला नाही
मुंबईत नुकत्याच झालेल्या इंडिया आघाडीच्या सभेत प्रकाश आंबेडकर यांनी जनसमुदायाला संबोधित केले. महाराष्ट्रातील एकूण 48 जागांपैकी प्रकाश आंबेडकर यांनी किमान 6 जागांची मागणी केली होती. मात्र, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जागावाटपात केवळ चार जागा आंबेडकरांच्या वंचित आघाडीला दिल्या जातील, असे स्पष्ट केले. त्यामुळं लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या, मात्र, तरी MVA जागावाटपाचा तिढा अजून सुटलेला दिसत नाही.
वंचितचा मविआत समावेश होणार?
तर दुसरीकडे, त्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र पाठवून वंचित आघाडी काँग्रेसला सात जागांवर पाठिंबा देणार असल्याचे म्हटले होते. तसेच या सात जागा कोणत्या असाव्या, हे आम्हाला कळवावं, असं म्हटलं हतों. मात्र, अद्याप कॉंग्रेसकडून आंबेडकरांना कोणतंही उत्तर आलं नाही. त्यामुळं शिवाय महाविकास आघाडीची अलीकडेच एक बैठक झाली. त्यात बैठकील आंबेडकरांना आमंत्रित केलं नव्हतं. त्यामुळं वंचितची महाविकास आघाडीशी झालेली आजवरची चर्चा निष्फळ ठरली आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.