Download App

मला जेव्हा बोलायचं असेल तेव्हा मी बोलणारच, पंकजा मुंडेंच्या विधानाने खळबळ…

Pankja Munde News : मला जेव्हा बोलायचं असेल तेव्हा मी बोलणारच असल्याचं विधान भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी हात जोडत केलं आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच गोपीनाथ गडावर पंकजा मुंडेंनी केलेल्या विधानानंतर राजकारणात चर्चांना ऊत आला होता. त्यानंतर आताही पुन्हा त्याचं चर्चेला तोंड फुटलंय.

चाल उनकी चल सकते है क्या आप; शायराना अंदाजात भुजबळांनी गाजवलं ‘षण्मुखानंद’

3 जून रोजी गोपीनाथ गडावर आयोजित पत्रकार परिषदेत पंकजा मुंडे यांनी खदखद बोलून दाखवली होती. गेल्या चार वर्षांत अनेक खासदार आमदार झाले आहेत. पण मी पात्र नसेल तर चर्चा तर होणार असल्याची खदखद पंकजा मुंडेंनी थेट बोलूनच दाखवली होती.

पैठणमध्ये आईच बनली वैरी: अडीच वर्षाच्या चिमुकल्याला पाच लाखात विकले

त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली होती. अनेकांकडून तर पंकजा मुंडे यांची पुढील राजकीय कारकीर्द कशी पाहायला मिळणार आहे? अशा चर्चा सुरु होत्या. असं असतानाच आज पुन्हा त्यांनी नाराजीची भावना व्यक्त केली आहे.

‘मी मोदींचा फॅन’ एलॉन मस्कने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

पंकजा मुंडे यांना मागील विधानाबाबत पुन्हा एकदा विचारण्यात आलं असता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पंकजा मुंडे म्हणाल्या, मी दसरा मेळावा, 3 जून रोजी हीच विनंती केली आहे, मला जेव्हा बोलायचं तेव्हा मी बोलेन, असं वक्त्य त्यांनी केलं आहे.

दरम्यान, 3 जूनला गोपीनाथ गडावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात भाजपमध्ये पंकजा मुंडेंची घुसमट होत असल्याचं दिसून आलं होतं. त्यामुळे भाषणात त्यांनी विरोधकांना इशाराही दिला होता. मी रुकणार नाही, मी झुकणार नाही, मी थकणार नाही…असे म्हणत पंकजा मुंडे यांनी आपल्या पक्षातील विरोधकांना इशारा दिला होता.

Tags

follow us