Download App

अहमदनगरचे अहिल्यानगर कधी होणार? पडळकरांच्या प्रश्नावर सरकारकडून उत्तर

  • Written By: Last Updated:

नागपूर : चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज विधानपरिषदेत “अहमदनगरचे अहिल्यानगर कधी होणार?” असा प्रश्न उपस्थित केला. यावेळी बोलताना पडळकर म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं काम अखंड हिंदुस्थानामध्ये सगळ्यांना सर्वश्रुत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी विश्वेश्वराचा कॉरिडॉर निर्माण केला. त्याचा लोकार्पण झाला फेब्रुवारी महिन्यामध्ये आणि तिथं पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा पुतळा केंद्र सरकारच्या वतीनं बसवून अहिल्यादेवींच्या कामाची पोचपावती केंद्र सरकारनं दिलेली आहे.”

त्यामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म नगर जिल्ह्यामध्ये चौंडी येथे झालेला आहे आणि महाराष्ट्रातील तमाम लोकांची भावना आहे. की अहिल्यानगर हे नाव अहमदनगरला देण्यात यावं. तर सरकारच्या वतीनं सकारात्मक उत्तर मिळालेलं आहे. सरकारकडं माझी हीच मागणी आहे की तुम्ही किती दिवसामध्ये अहमदनगरचं नाव अहिल्यानगर देणार आहात?”

गोपीचंद पडळकरांच्या प्रश्नाला दीपक केसरकर यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की “केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार अहमदनगर शहराचे नाव बदलण्याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर करण्याबाबत जिल्हाधिकारी अहमदनगर व विभागीय आयुक्त नाशिक विभाग यांना 7 सप्टेंबर 2022 च्या पत्रान्वये करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडून प्रस्ताव तयार करणेबाबत विविध स्थानिक विभाग प्रभाग प्रमुखांकडून 3 नोव्हें. २०२२ पत्रान्वये पुढीलप्रमाणे माहिती मागवण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये अहमदनगरचं नाव बदलण्याच्या संदर्भात त्यानंतर विभागीय रेल्वे कार्यालय यांच्याकडून माहिती मागवली आहे. पोस्ट ऑफिसची ना हरकत मागवलेली आहे. आणि तहसीलदारकडून काही माहिती मागवलेली आहे.”

Tags

follow us