मुंबई : अनेकदा वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांनी राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली होती. काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यात कधीही विधानसभेच्या निवडणुका (assembly elections) होऊ शकतात, त्यामुळं कार्यकर्त्यांनी कामाला लागावं असं विधान केलं होतं. तर काहींनी देशात लोकसभा निवडणुका आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी होऊ शकतात, अशी वक्तव्यं केली होती. दरम्यान, आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी आगामी विधासभा निवडणुकांविषयी मोठं भाष्य केलं. शिंदे-फडणवीस सरकार सप्टेंबर-आक्टोंबर पर्यंत चालेल, त्यांनतर लगेच निवडणुका होतील, असं त्यांनी सांगितलं.
आगावी 2024 या वर्षात देशभरात लोकसभा निवडणुका होणार आहेत. तर काही राज्यांत विधानसभेच्या देखील निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्र विधानसभेचेही निवडणूक 2024 मध्ये आहे. याच निवडणुकीच्या अनुषंगाने बोलतांना बावनकुळे यांनी सांगितलं की, लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणुका वेगळ्या आहेत. अनेकजण सांगतात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होतील. मात्र, विधानसभा निवडणुकीचा लोकसभा निवडणुकींशी काहीही संबंध नाही. देवेद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच सरकार हे 2024 च्या सरकार सप्टेंबर-आक्टोंबर पर्यंत चालेल. त्यानंतर विधानसभा निवडणुका होतील, असं त्यांनी सांगितलं.
Uddhav Thackeray वैफल्यग्रस्त : आम्हीही त्यांना उद्धट, उद्धवस्त ठाकरे म्हणू शकतो…
बावनकुळे म्हणाले की, शिंदे-फडणवीस सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल. त्यानंतर निवडणुका लागतील. कशाकरता सहा महिने लोकांचा विकास थांबवायचा. आणि लोकसभा -विधासभा निवडणुका ह्या एकत्र घ्यायच्या. आणि कोण लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र करण्याचं समर्थन करेल. कशा करता ह्या दोन्ही निवडणूका एकत्र होतील. लोकसभा निवडणूका आणि विधानसभा निवडणूका वेगवगळ्या आहेत, असं त्यांनी सांगिलतं.
जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील 40 आमदारांना सोबत घेऊन मोठं बंड केलं होतं. शिंदेंनी केलेल्या बंडामुळं महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं. त्यामुळं उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या होत्या. शिंदे यांनी भाजपसोबत जाऊन राज्यात नवं सरकार स्थापन केलं. नव्या शिंदे-फडणवीस सरकारला नऊ महिने पूर्ण झाली आहेत. मात्र, राज्य सरकार कधीही कोसळेल, असं महाविकास आघाडीतील नेते सांगत असतात. दरम्यान, आता बावनकुळेंनी शिंदे-फडणवीस सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल असं सांगितलं. त्यामुळं शिंदे-फडणवीस सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल का, हेच पाहणं महत्वाचं आहे.